Tuesday, July 21, 2026
Homeगडचिरोलीदौलत कुथे ‘नाट्यश्री २०२५’ पुरस्काराने सन्मानित..

दौलत कुथे ‘नाट्यश्री २०२५’ पुरस्काराने सन्मानित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-नाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोली यांच्या वतीने आयोजित ‘महामृत्युंजय वाड्:मय स्पर्धा २०२५’ पुरस्कार वितरण सोहळा काल,रविवार ७ डिसेंबर रोजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक  गडचिरोलीच्या सभागृहात उत्साहात पार पडला. साहित्य,कला आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष लौकिक प्राप्त झाला.या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते दौलत कुथे यांचा सत्कार सोहळा.कला व साहित्य क्षेत्रातील त्यांचे मोलाचे योगदान लक्षात घेऊन त्यांना ‘नाट्यश्री २०२५’ हा गौरवशाली पुरस्कार सन्मानचिन्ह,सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.एन.पठान होते.उद्घाटक म्हणून पद्मश्री डॉ.परशुराम खुणे हे होते. तसेच ज्येष्ठ रंगकर्मी,समीक्षक व कादंबरीकार प्राचार्य डॉ.शाम मोहरकर(चंद्रपूर),साहित्यिक डॉ.नीलकांत कुलसंगे (नागपूर),उषाकिरण आत्राम(गोंदिया), पत्रकार देशमुख,महेश पातूरकर,नाटककार चुडाराम बल्लारपूरे, दादाजी चुधरी यांचीही उपस्थिती लाभली. या प्रसंगी राजश्री शाहू महाराज अभिनव कला अकॅडमीचे स्नेही विलास गोदोळे,उमेश गजपुरे,संजय बिडवाईकर,बलराम दर्वे,शालिक पत्रे,किशोर हाडगे, रंजीत बनकर,डॉ.रेखलाल कटरे,अरुण चोपकार,प्रा. अशोक भेंडारकर,सत्यवान वाघाडे,गोविंदा बोळणे, दिगांबर कार,कामिनी पेंदाम, शांतीप्रिया दिवटे,रजनी पत्रे,देवयानी कुथे आदींनी दौलत कुथे यांचे अभिनंदन करीत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.यापूर्वीही नाट्यकलावंत दौलत कुथे यांना विविध पुरस्कार व सत्कारांनी सन्मानित करण्यात आले असून त्यांचा सत्कार पाहून उपस्थित प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उत्कृष्टरीत्या पार पडले.याबद्दल नाट्यश्री साहित्य कला मंचाच्या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मन सुन्न करणारी घटना..! जन्मदातीने दहा महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेतला अन् मृतदेह खांद्यावर घेऊन पोहचली ठाण्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-सोलापूर जिल्ह्यातून मन सुन्न करणारी घटना आज सोमवारी सर्वत्र उघडकीस आली. एका २६ वर्षीय जनमदात्या आईने स्वतःच्या दहा महिन्याच्या पोटच्या लेकीला संपवून...

कोणताही पात्र बांधकाम कामगार योजनांपासून वंचित राहू नये.. -प्रत्येक ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर विशेष जनजागृती मोहीम राबवा- आमदार रामदास मसराम

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई अंतर्गत जिल्हा कामगार सुविधा केंद्र,गडचिरोली यांच्या वतीने आज,सोमवार २० जुलै रोजी देसाईगंज पंचायत समिती...

तब्बल ११७ आपले सरकार सेवा केंद्रांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात ११५ ग्रामपंचायत व दोन नगरपरिषद/नगरपंचायत स्तरावरील एकूण ११७ आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी १५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात...

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ विद्यार्थी उतरले रत्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-देशातील सध्याचे चित्र काही खरे नाही. अनेकजण आपली जबाबदारी व चूक मान्य करण्यास तयारच नाहीत.तुम्ही काहीही करा,आम्हाला कसलाही फरक पडणार नाही....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!