- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपुर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातील पवनी गावालगतच्या मोदी शेत शिवारात शेतात काम करीत असलेल्या शेत मजुरावर वाघाने हल्ला चढवून ठार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आल्याने वनविभागप्रती संताप व्यक्त केला जात आहे.विशेष म्हणजे,घटना घडल्यानंतर नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागू नये,यासाठी घटनेबाबत वनविभागाने गोपनीयता बाळगली होती.अशोक उईके वय ५० वर्षे, रा.मोदी,ता.रामटेक,जि.नागपूर असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतमजुराचे नाव असून तो काल शुक्रवारी अग्रवाल यांच्या शेतावर काम करत होता.अशोक उईके हा रात्र होऊनही घरी परतला नसल्याने कुटूंबीय तसेच ग्रामस्थांनी मोदी गावालगत असलेल्या शेत शिवारात शोध घेतला असता छिन्न विच्छिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला.लागलीच घटनेची माहिती वन विभागास देण्यात आली.घटनेच्यावेळी शिवारात कुणीही नसल्याने हा हल्ला कुणाच्याही लक्षात आला नाही.त्यामुळे कुणीही त्याच्या मदतीला धावले नाही आणि घटनेबाबत गोपनीयता बाळगण्यात आली.सदरची घटना रात्री उशिरापर्यंत माहिती झाल्याने सदर प्रकार उजेडात आला.रात्रीच्या सुमारासच पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला.घटनेने परिसरात दहशत पसरली असून वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी मोदी ग्रामवासिय जनतेनी केली आहे.
- Advertisement -

