Tuesday, September 1, 2026
Homeनागपूरअतिवृष्टीने शेतीचे नुकसान झालेल्या पैस्यावर डोळा; चौकशी अंती ग्रामसेविका निलंबित.

अतिवृष्टीने शेतीचे नुकसान झालेल्या पैस्यावर डोळा; चौकशी अंती ग्रामसेविका निलंबित.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपुर :-तब्बल चार महिने राज्याच्या विविध भागात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घालून नैसर्गिक संकटाने सर्वांना बेजार करून सोडले होते.अतिवृष्टी,पूर आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने राज्य सरकारने मागील महिन्यात घरे,जनावरे, शेत पिकांचे नुकसान,शेत जमिनीचे नुकसान,मृत जनावरांसाठी नुकसान व इतर आर्थिक सहाय्य शासन स्तरावरून मंजूर करून अनेकांना दिलासा दिला.मात्र, काही ठिकाणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून अधिकारी, कर्मचारी पैश्याची मागणी करण्यात येत असल्याच्या घटना उघडकीस आल्याने याबाबत काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी याविरोधात आवाज उठवला होता.अश्यातच नुकतेच एका पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या पराटी (कापूस)नुकसानीची खात्यावर रक्कम जमा होताच एका ग्रामपंचायतीच्या ऑपरेटरने शेतकऱ्यास फोन करून ‘तुम्ही दोन हजार रुपये ठेवा व उर्वरित रक्कम परत करा, मला मॅडमचा फोन आला होता’; असे म्हटल्याची ऑडियो क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती.सदरची ऑडियो क्लिप कुठली अन् ती मॅडम कोण?अश्या चर्चांना उधाण आले होते. त्यानुसार,४ नोव्हेंबर २०२५ रोजी काही माध्यमांनी बातम्या प्रसारित करून टीकेची तोफ डागली होती. ऑडियो क्लीप व्हायरल होताच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चौकशीचे आदेश दिले असता सदरची क्लिप ही नरखेड तालुक्यातील असल्याचे स्पष्ट झाले.त्यामुळे नरखेड पंचायत समितीचे बीडीओ यांनी चौकशीसाठी दोन सदस्यीय समिती नेमली.चौकशी समितीतील विस्तार अधिकारी विनोद श्रृंगारे,कृषी विस्तार अधिकारी पंकज चव्हाण यांनी चौकशी केली असता नरखेड तालुक्याच्या मुक्तापुर पेठ ग्रामपंचायतीत कार्यरत असणाऱ्या ग्रामसेविका श्वेता खांडे यांच्यासाठी शेतकऱ्याकडून रक्कम मागण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे.ग्रामपंचायतीच्या कॉम्प्युटर ऑपरेटरने शेतकऱ्याला तुमच्या खात्यात ६ हजार ८०० रुपये जमा झाले आहेत.त्यातील दोन हजार तुम्ही ठेवा आणि  ४ हजार ८०० मॅडमला परत करायचे आहे.मॅडमचा फोन आला होता असे म्हटले होते.प्रकरणी ग्रामसिवेका श्वेता खांडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!