Saturday, September 26, 2026
Homeनागपूरआई आणि मुलाचा एकाच वेळी दुर्दैवी मृत्यू; गावात स्मशान शांतता.

आई आणि मुलाचा एकाच वेळी दुर्दैवी मृत्यू; गावात स्मशान शांतता.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील चनकापूर गावात आई आणि मुलाच्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण गावात स्मशान शांतता पसरल्याची घटना घडली आहे.वीज प्रवाह असलेल्या वायरला स्पर्श होताच आई कोसळल्याचे पाहून मुलाने धाव घेत तिला वाचवण्याचा प्रयत्न केला.यात त्यालाही विजेचा जोरदार धक्का बसल्याने आईसह मुलाचाही मृत्यू झाला.५० वर्षीय निर्मला उत्तम सोनटक्के व २९ वर्षीय मुलगा लकी उत्तम सोनटक्के दोघेही रा.चनकापूर,ता.सावनेर असे मृत आई व मुलाचे नाव आहे
निर्मला सोनटक्के यांना दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन अपत्ये आहेत.त्यांचे पती दुसऱ्या पत्नीसोबत दुसरीकडे राहत असल्याने त्या तिघांसोबत चनकापूर येथे राहायच्या.मुलगा लकी वेकोलिमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करायचा.घटनेच्या दिवशी म्हणजेच काल शुक्रवारी सकाळच्या सुमारास घरच्यांचे कपडे धुऊन झाल्यानंतर ते वाळविण्यासाठी  दोरीवर साडी टाकायला गेल्या.इतक्यात भिंती जवळच वीजप्रवाह असलेला एक वायर तुटून पडला होता.त्याकडे निर्मला यांचे लक्ष नसल्याने न कळत त्याला स्पर्श झाला.यात जोरदार विजेचा धक्का लागल्याने त्या वायरला धरुनच खाली कोसळून बेशुद्ध झाल्या.लागलीच लकी तिला वाचविण्यासाठी धावला.त्याने आईला पकडून ओढण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही विजेचा जोरदार धक्का लागला.घटनेच्या वेळी दोन्ही बहिणी घरीच असल्याने दोन्ही बहिणींनी आरडाओरड करताच घरा शेजारील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत सर्वप्रथम घरातील वीजपुरवठा बंद करून आई आणि मुलाला सावनेर तालुक्याच्या दहेगाव(रंगारी)येथील खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले.घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून आज शनिवारी आई आणि मुलाच्या पार्थिवावर एकाच वेळी अंत्यसंस्कार पार पडणार आहे.मृतक लकी अविवाहित होता आणि घरची संपूर्ण जबाबदारी तोच सांभाळायचा.त्याचबरोबर त्याच्या दोन बहिणी अविवाहित असून एक बहिण २७ वर्षाची तर एक बहिण २२ वर्षे वयाची आहे.घटनेप्रकरणी खापरखेडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू ठेवला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी,शेतमजूर, कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-‘दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी, शेतमजूर,कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत.आम्ही शेतकऱी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे...

पोलीस दलात खळबळ; बेपत्ता पोलीस कर्मचाऱ्याचा सापडला मृतदेह..!

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-जिल्ह्याच्या पिंपरी-चिंचवड शहराच्या पोलीस दलात खळबळ उडवणारी घटना आज,शनिवार २६ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. तब्बल तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या...

बस आणि कारची समोरासमोर धडक; बीसीएन न्यूजचे संपादक गंभीर जखमी.. -नागपूरला हलवले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला.झालेल्या अपघातात कारमधील बीसीएन न्यूजचे संपादक...

राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर.. -पहा संपूर्ण तालुक्यांची यादी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-यंदाच्या एलनिनोच्या प्रभावामुळे राज्याच्या विविध भागात दुष्काळी परिस्थिती उद्भवलेली आहे. राज्यातील विविध तालुक्यांमध्ये जून ते आजपर्यंतच्या कालावधीतील पर्जन्याची तूट व अन्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!