Monday, August 31, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनक्षल चकमक; दोनदा वीरता पदक प्राप्त पीएसआय शर्मा शहीद..

नक्षल चकमक; दोनदा वीरता पदक प्राप्त पीएसआय शर्मा शहीद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र,मध्य प्रदेश आणि छत्तीसगड सीमेलगतच्या जंगल परिसरात काही नक्षलवादी दबा धरुन बसल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाकडून शोधमोहीम राबवित असतांनाच नक्षलवाद्यांनी बेछुटपणे अंधाधुंद गोळीबार केला.यात  मध्यप्रदेश हॉकफोर्सचे पीएसआय(पोलीस उपनिरिक्षक)आशिष शर्मा यांच्या हात,पाय व पोटावर गोळ्या लागल्याने लगेच त्यांना डोंगरगढ येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र,उपचारादरम्यान त्यांना वीरमरण आले.४० वर्षीय आशिष शर्मा हे मध्यप्रदेशातील नरसिंहपुर जिल्ह्यातील गाडरवारा तालुक्यातील बोहानी येथील रहिवासी आहेत. त्यांना यापुर्वी दोनवेळा भारत सरकारच्यावतीने वीरता पदक मिळाले आहे.शर्मा हे २०१६ मध्ये पोलीस उपनिरिक्षक पदावर म्हणून रुजू झाले होते.येत्या जानेवारी २०२६ मध्ये त्यांचे लग्न होणार होते.शर्मा यांनी फेबुवारी २०२५ मध्ये बालाघाट जिल्ह्यातील रोंढा जंगलात झालेल्या नक्षल चकमकीत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.त्यात तीन महिला नक्षली ठार केले होते.काल बुधवारी महाराष्ट्र,मध्य प्रदेश आणि
छत्तीसगड सीमावर्ती भागातील जंगल परिसरात नक्षलवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सीमेवर मध्यप्रदेश व छत्तीसगड पोलिसांच्या वतीने सीमेवरील बोरतलाव भागाला लागून असलेल्या कांगुराच्या घनदाट जंगलात संयुक्त मोहीम सुरू करण्यात आली होती.त्या मोहिमेचे नेतृत्व शर्मा करीत होते.दरम्यान, आधीपासूनच दबा धरुन बसलेल्या नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार सुरु केला.त्या गोळीबाराला प्रत्युत्तर देतांना नक्षलवाद्यांकडून झालेल्या गोळीबारात पोलीस उपनिरिक्षक शर्मा जखमी झाले.तेव्हा लगेच त्यांना डोंगरगढ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र,उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!