Friday, September 4, 2026
Homeगोंदियाऐन सापळ्याच्या वेळीच 'बाबा को लेके आता हूँ' म्हणत झाला गायब..! -...

ऐन सापळ्याच्या वेळीच ‘बाबा को लेके आता हूँ’ म्हणत झाला गायब..! – तरीही तलाठ्यावर गुन्हा दाखल.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-लाच देणे आणि घेणे हे दोन्ही गुन्हे मानले जातात.पण,एखाद्या व्यक्तीला थोडी नं खिशाला खाज असते की आपल्याकडील रक्कम एखाद्या फुकट्याला द्यावी म्हणून.काहींचे नुसत्या वरच्या कमाईमुळे महिण्याकाठी मिळणारे पगार जैसे थे असते,तर काहींना पगार आणि वरची केलेली कमाईही पुरत नसल्याचे विदारक चित्र आहे.अश्यातच गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तहसील कार्यालयांतर्गत येणाऱ्या तलाठी म्हणजेच ग्राम महसूल अधिकाऱ्यास लाच घेतांना रंगेहाथ पकडणार तोच त्यास भनक लागली आणि ऐन सापळ्याच्या वेळीच ‘बाबा को लेके आता हूँ’ असे म्हणत गायब झाला तो कार्यालयात परतलाच नाही.मात्र,१५ हजार रुपयांपैकी तडजोडीनंतर १४ हजार रुपये घेण्याचे ठरल्याने एसीबीने कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ नुसार गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अरविंदकुमार युवराज डहाट वय ४३ वर्षे असे लाच प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या तलाठ्याचे नाव आहे.
गोरेगाव येथील ३६ वर्षीय तक्रारदार यांनी गट क्र.१००४/४ मधील ३०५.५० चौ.मी.जागेच्या अकृषक विकास परवानगीसाठी मौका चौकशी करून त्याचा अहवाल तहसील कार्यालयात पाठवावा, यासाठी डहाट यांची भेट घेतली होती.भेटीत डहाट यांनी १५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर १४ हजार रुपये देण्याचे ठरले.मात्र,ऐन सापळ्याच्या वेळीच अरविंदकुमार डहाट याला संशय आल्याने रक्कम न घेताच कार्यालयातून गायब झाला.यानंतर मंगळवार ४ नोव्हेंबर २०२५ रोजी तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागास माहिती देत आरोपीस संशय आल्याने तो लाच स्वीकारण्यास तयार नाही व कार्यालयात हजर राहत नाही,असे कळवताच पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली.सदरची कारवाई पोलिस निरीक्षक उमाकांत उगले,पोलिस निरीक्षक अरविंद राऊत,सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत करपे,पोलिस हवालदार संजय बोहरे,मंगेश काहाळकर, अशोक कापसे,संतोष बोपचे,संतोष शेंडे,दीपक भाटबर्वे, पोलिस नाईक संगीता पटले,प्रशांत सोनवणे,कैलास काटकर व रोहिणी डांगे यांनी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!