- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-मध्यरात्रीच्या सुमारास गोंदियाहून आमगावकडे स्वतःच्या दुचाकीने निघालेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणाची भरधाव वेगात असलेली दुचाकी रस्ता डीव्हायडरला(रस्ता दुभाजक)आदळली. यात तरुणाच्या डोक्याला जबर मार लागल्याने जागीच ठार झाल्याची घटना काल मंगळवारच्या मध्यरात्री आमगाव-गोंदिया महामार्गावर घडली.१७ वर्षीय नमन हेमंत रहांगडाले रा.कोसमटोला-आसोली,ता.आमगाव, जि.गोंदिया असे अपघातात ठार झालेल्या अल्पवयीनाचे नाव असून प्रकरणी २९ वर्षीय उमाकांत इंद्रराज रहांगडाले रा.कोसमटोला याने दिलेल्या तक्रारीवरून आमगाव पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली.
मध्यरात्रीच्या सुमारास एमएच ३५-बीए ५३९३ क्रमांकाच्या दुचाकीने नमन रहांगडाले हा गोंदियाहून आमगावकडे जात होता.मुख्यत्वे,शहरातून दोन्ही बाजूंनी वाहने जावीत यासाठी रस्त्याच्या मधोमध डीव्हायडर (रस्ता दुभाजक)तयार करण्यात आले आहेत.अश्यातच दुचाकीने जाणाऱ्या नमनचा दुचाकी वाहनावरील नियंत्रण सुटून भरधाव वेगात असलेली दुचाकी रस्त्याच्या मधोमध असलेल्या लोखंडी अँगल व रस्ता दुभाजकाला जाऊन जोरदार आपटली.यात नमन मार्गावर उसळून पडल्याने त्याच्या डोक्याला जबर मार लागून रक्तस्राव होऊ लागला.डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने नमनचा घटनास्थळीच मृत्यू झाला.प्रकरणी आमगाव पोलिस ठाण्यात नोंद करून घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार उईके करीत आहेत.
- Advertisement -

