- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-माहे नोव्हेंबर महिन्यातील लोकशाही दिनाचे आयोजन उद्या,सोमवार ३ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात दुपारी ३ वाजता करण्यात आले आहे.तक्रार अर्ज स्वीकारण्याची वेळ दुपारी २ ते ३ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.तालुका पातळीवरील लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारींचे समाधानकारक निराकरण न झाल्यास अशा तक्रारदारांनी जिल्हास्तरावरील लोकशाही दिनासाठी अर्ज सादर करावेत.या अर्जात तालुका स्तरावरील अहवालाची प्रत व टोकन क्रमांक जोडणे आवश्यक आहे.तक्रार अर्ज विहित नमुन्यात (प्रपत्र १ अ ते १ ड) दोन प्रतींमध्ये सादर करावे लागतील.तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असावे.सामूहिक स्वरूपाचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत,असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा लोकशाही दिनाचे अध्यक्ष अविश्यांत पंडा यांनी कळविले आहे.
- Advertisement -

