Friday, October 16, 2026
Homeकुरखेडाकिशोर अंबरदास कोल्हे यांना केंद्रसंचालक पदावरून केले पदमुक्त - कुरखेडा शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयातील...

किशोर अंबरदास कोल्हे यांना केंद्रसंचालक पदावरून केले पदमुक्त – कुरखेडा शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयातील प्रकरण 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कुरखेडा :- शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात बारावी परीक्षेत कॉपी करण्यासाठी पैसे उकळणाऱ्या केंद्रप्रमुखाचा कथित व्हिडीओ व्हायरल झाला होता.या प्रकरणात माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या नागपूर येथील सचिवांनी कारवाईचे निर्देश दिले.त्यानुसार, ९ मार्च रोजी तहसीलदारांनी केंद्रप्रमुख प्रा.किशोर अंबरदास कोल्हे याच्याविरोधात कुरखेडा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.यामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे 

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा १२ वी फेब्रुवारी, मार्च २०२३ परीक्षा केंद्र ६२७ केंद्र संचालकाबाबत व्हायरल झालेल्या व्हिडीओ व त्या अनुषंगाणे शिक्षण विभाग माध्यमिक व उच्च माध्यमिक सदर बाबीचे गांभीर्य विचारात घेवून गटशिक्षणाधिकारी तथा तालुका परीरक्षक सी.ए.पुराणिक यांनी चौकशीचे आदेश देण्यात आले.सदर चौकशीचा अहवाल व सचिव,विभागीय मंडळ नागपुर यांनी केलेल्या सूचनेनुसार तात्काळ किशोर अंबरदास कोल्हे यांचे केंद्रसंचालक पदावरून पदमुक्त केले असून त्यांचे ऐवजी कालीदास पुंडलीक सोरते उच्च माध्यमिक शिक्षक यांची नियुक्ती केंद्र संचालक म्हणून करण्यात आली आहे.तसेच सदरच्या गंभीर प्रकाराबाबत चौकशी करणेबाबत विभागीय सचिव यांनी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना आदेश दिले आहेत. इयत्ता १० वी १२ वी च्या परीक्षा संबंधाने कोणताही गैरप्रकार झाल्यास दोषी विरुध्द नियमानुसार कडक कार्यवाही केली जाईल; असे शिक्षणाधिकारी माध्यमिक तथा सदस्य सचिव जिल्हा दक्षता समिती गडचिरोली आर.पी.निकम यांनी दिले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी असून या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी...

महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन; राज्यात ५० लाखांहून अधिक अर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेती व शेतीपूरक व्यवसायांमध्ये कार्यरत महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळवून देणाऱ्या महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अधिकाधिक महिलांनी अर्ज करावेत,असे आवाहन आंतरराष्ट्रीय...

अखेर राज्यातील सर्व ग्राम रोजगार सेवकांच्या मानधन वितरणाचा मार्ग मोकळा..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्राम पातळीवर काम करणाऱ्या ग्रामरोजगार सहायकांच्या मानधन वितरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून राज्यातील सर्व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!