Saturday, September 5, 2026
Homeगोंदियागावातील गलिच्छ राजकारण..! ज्या महिला सरपंचाने देशपातळीवर नाव लौकीक केले त्यांच्यावरच अविश्वास...

गावातील गलिच्छ राजकारण..! ज्या महिला सरपंचाने देशपातळीवर नाव लौकीक केले त्यांच्यावरच अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-गावातील राजकारण किती गलिच्छ असते,हे गोंदिया जिल्ह्यातील डव्वा ग्रामपंचायतीत उघडकीस आले आहे.विशेष म्हणजे,ज्या महिला सरपंचाने गावात नाविण्यपुर्ण उपक्रम राबवून गावाचा नाव देशपातळीवर लौकीक करून ग्रामपंचायतीला १ कोटी रुपये पुरस्कार मिळवून दिले; अश्या महिला सरपंचा योगेश्वरी चौधरी यांच्याविरुद्ध ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव मांडून सरपंचांना हटविण्याचा प्रयत्न केला गेला असल्याने गावकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते.
गाव आपला आहे,आपली लोकं याठिकाणी वास्तव्यास आहेत,आपल्या गावाचा विकास महत्वाचा असून राजकारण करण्यात काहीही अर्थ नाही.पण काहीजण जाणूनबुजून फालतूगिरी करतांना दिसून येतात.चांगले कार्य करतांना काहींच्या दिमाकात अळ्या खवलतात की काय?असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा ग्रामपंचायमध्ये एकूण सदस्य संख्या ११ असून (एक सदस्याने राजीनामा दिलेला आहे) सरपंचासह एकूण १२ सदस्यांची ही ग्रामपंचायत आहे.मागील काही दिवसांपासून सरपंच आणि सदस्यांमध्ये अंतर्गत वाद सुरू आहे.यावरून सदस्यांनी सरपंचावर अविश्वास प्रस्ताव मांडला.काल मंगळवारी यासाठी सभा आयोजित करण्यात आली होती.यात अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने ८ सदस्य होते.त्यातच बहुमताचा आकडा ९ असल्याने अविश्वास बहुमत सिद्ध झाले नाही.असे तहसीलदार इंद्रायणी गोमासे यांनी जाहीर केले.विशेष मासिक सभेत झालेल्या मतदानात अविश्वास प्रस्तावाला आवश्यक बहुमत न मिळाल्यामुळे हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. अविश्वास प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर नागरिक मोठ्या संख्येने गोळा झाले होते.सरपंचाविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणल्याने जनतेने उग्ररूप धारण केले होते. यामुळे या प्रक्रियेदरम्यान तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता.माझी वसुंधरा हे अभियान डव्वा गावाने यशस्वीपणे राबवून देशात प्रथम क्रमांक पटाकाविला होता.या ग्रामपंचायतीला १ कोटी रुपये पुरस्कार स्वरुपात प्राप्त झाले होते.येथील सरपंच योगेश्वरी चौधरी यांनी गावात नाविण्यपुर्ण उपक्रम राबवून गावाचा देशपातळीवर नाव लौकीक केला होता.तरीही काहीजण आपली दाल गलत नसल्याने गलिच्छ राजकारण करत असल्याचे दिसून येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!