- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे येत्या,शुक्रवार १९ सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून ते जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल,मुद्रांक शुल्क, नोंदणी तसेच भूमी अभिलेख विभागाच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत.त्याचप्रमाणे नागरिकांची निवेदनेही स्विकारणार आहेत.
दौरा कार्यक्रम : १९ सप्टेंबर रोजी सकाळी १२ ते दुपारी १ वाजे जिल्हाधिकारी कार्यालयात नागरीकांची निवेदने स्विकारतील.दुपारी १ ते २.३० वाजे जिल्हाधिकारी यांच्याकडील प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला जाईल.दुपारी २.३० ते ३.३० वाजे मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाचा आढावा,दुपारी ३.३० ते ४.३० वाजे भूमी अभिलेख विभागाचा आढावा घेण्यात येईल. सायंकाळी ५ वाजता पत्रकारांशी संवाद.सायंकाळी ५.३० ते ७ वाजे महाराजा लॉन्स,धानोरा रोड,गडचिरोली येथे राखीव.
- Advertisement -

