Wednesday, September 9, 2026
Homeगडचिरोलीएटापल्ली तालुक्याच्या जंगल परिसरात नक्षल चकमक; दोन महिला नक्षली ठार..

एटापल्ली तालुक्याच्या जंगल परिसरात नक्षल चकमक; दोन महिला नक्षली ठार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-नुकतेच रविवार १४ सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील परायणार गावाचा रहिवासी असलेल्या एका ३२ वर्षीय जहाल नक्षलवाद्यास जवानांनी भामरागड  तालुक्याच्या तिरकामेटाच्या जंगल परिसरातून अटक केली होती. शनिवारी विशेष अभियान पथकातील जवान नक्षलविरोधी अभियान राबवीत असतांनाच ताडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या तिरकामेटा जंगल परिसरात एक संशयित व्यक्ती आढळून आला होता. त्यास ताब्यात घेऊन अहेरी येथील प्राणहिता पोलिस उपमुख्यालयात नेऊन चौकशी केली असता,चौकशीअंती तो शंकर भिमा महाका वय ३२ वर्षे,रा.परायणार, ता.भामरागड,जि.गडचिरोली येथील रहिवासी असलेला भामरागड दलमचा सदस्य असल्याचे निष्पन्न झाले होते.अश्यातच आता आज,बुधवार १७ सप्टेंबर रोजी
गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील मोडस्के गावच्या जंगल परिसरात पोलीस आणि नक्षल चकमक उडाली.चकमकीत दोन महिला नक्षली ठार झाल्या असून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.तसेच घटनास्थळावरून दोन मृतदेहांसह एक स्वयंचलित एके ४७ रायफल,एक अत्याधुनिक पिस्तुल,जिवंत दारुगोळा व अन्य साहित्य ताब्यात घेण्यात आले आहेत.
एटापल्ली तालुक्याच्या मोडस्के जंगल परिसरात गट्टा दलमचे काही नक्षलवादी दबा धरुन बसल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलीस स्टेशन गट्टा जांबियाचे पोलीस पथक व केंद्रीय राखीव दलाचे १९१ बटालियनच्या ई कंपनीकडून जंगल परिसराला चारही बाजूंनी घेराबंदी घालण्यात आली.त्यानंतर अहेरी येथील प्राणहिता पोलिस उपमुख्यालयाचे अप्पर पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनीही  पोलिसांच्या सी-६० दलाची पाच पथके रवाना केली.त्यानुसार जंगल परिसरात शोधमोहीम सुरू असतांनाच नक्षलवाद्यांनी जवानांवर अंधाधुंद गोळीबार सुरू केला.जवानांनी प्रत्युत्तर देत गोळीबार केला असता चकमक सुरू असतांनाच काही नक्षली जंगलाच्या दिशेने पळून गेले.चकमकीनंतर शोधमोहीम राबवली असता दोन महिला नक्षलिंचे मृतदेह तसेच नक्षलवादी साहित्य घटनास्थळावरून हस्तगत करण्यात आले आहेत.अद्याप नक्षली महिलांची ओळख पटलेली नसून त्या दिशेने तपास सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

देसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एकदा कां मोबाईल हरवला, तर तो परत मिळण्याची शाश्वती कमीच असते.मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत देसाईगंज...

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!