- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांची ई-पीक पाहणी नोंदणी करणे शासनाने अनिवार्य केले आहे. नुकसानभरपाई,धान विक्री व इतर सरकारी लाभ मिळवण्यासाठी ई-पीक पाहणी नोंदणी अत्यावश्यक असून येत्या,सोमवार १५ सप्टेंबर पर्यंत शेवटची तारीख आहे.त्यानंतर शासनाने नेमलेल्या सहाय्यक यांचे मार्फत ई-पीक पाहणी नोंदणी करण्यात येणार आहे.मात्र,तत्पूर्वी शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी नोंदणी करून घ्यावी,असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
आतापर्यंत जवळपास ६० टक्के शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.तर उर्वरित ४० टक्के शेतकऱ्यांच्या नोंदणीस अडचणी आहेत.हस्तलिखित माहिती अपडेट न राहण्याची समस्या आहे,तर स्मार्टफोन व नेटवर्क अभावामुळे अनेक शेतकऱ्यांना नोंदणी करतांना अडचणी येत आहेत.ई-पीक नोंदणी न केल्यास शेतकऱ्यांना कर्ज प्रकरण सादर करता येणार नाही, पीकविमा मिळणार नाही,नुकसान भरपाईसाठी ई-पंचनामे नाकारले जाऊ शकतात,धान खरेदी केंद्रावर विक्री करता येणार नाही,शासकीय अनुदान मिळण्यात अडचण येईल आणि चालू वर्षाचा सातबारा जारी होणार नाही.शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी आणि काही अडचणी असल्यास संबंधित कार्यालयात संपर्क साधावा,असेही आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
- Advertisement -

