Thursday, September 3, 2026
Homeगडचिरोलीकृषी केंद्र चालकाच्या मनमानीला चाप..! - गुण नियंत्रण अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना युरीया...

कृषी केंद्र चालकाच्या मनमानीला चाप..! – गुण नियंत्रण अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना युरीया खताचे वाटप..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-तालुक्याच्या गीलगाव येथील महंत कृषी केंद्र चालकाच्या मनमानीला चाप बसवून गुण नियंत्रण अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत परिसरातील शेतकऱ्यांना युरीया खताचे वाटप करण्यात आल्याने  शेतकऱ्यांना एकप्रकारे मोठा दिलासा मिळाला आहे.
शेतीच्या धानपिक वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या  युरीया खताच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते.अश्यातच गडचिरोली जिल्ह्यातील कृषी केंद्रांना युरीया खताचा पुरवठा होताच काही कृषी केंद्र चालकांनी मनमानी कारभार चालवून मर्जीतील लोकांना युरीया खताचे वाटप केल्याची ओरड शेतकऱ्यांकडून करण्यात आली.अश्याच प्रकारे गडचिरोली तालुक्याच्या गीलगाव येथील महंत कृषी केंद्र चालकास काही दिवसांपूर्वी ईफको(EFCO)कंपनीच्या युरीया खताच्या २६० बॅग म्हणजेच ११.७० मेट्रिक टन शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वितरीत करण्यात आल्या होत्या.मात्र,महन कृषी केंद्र चालकाने सदरच्या युरीया खताच्या बॅग गीलगाव तसेच परिसरातील शेतकऱ्यांना वाटप न करता परस्पर मर्जीतील लोकांना वाटप केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता.२६० बॅग प्राप्त होताच केंद्र चालकाने त्याच दिवशी १६० बॅग युरीया खत विक्री केली होती.गीलगाव येथे एकच कृषी केंद्र असल्याने या अंतर्गत गीलगाव, ऊसेगाव,खुर्सा व मुरमाळी येथील शेतकऱ्यांना युरीया खत वाटप करणे आवश्यक होते.मात्र,काही शेतकऱ्यांना युरीया खत न मिळाल्याने तुटवडा निर्माण होऊन शेतकऱ्यांनी आक्रोश करत परिसरातील गुण नियंत्रण अधिकारी अभिषाली येरमे यांच्याकडे धाव घेत तक्रार दाखल केली.त्यानुसार गुण नियंत्रण अधिकारी येरमे यांनी महन कृषी केंद्र चालकास १६० युरीया खताच्या बॅग कुणाला विक्री करण्यात आल्या,या बाबत कारणे दाखवा नोटीस बजावून गोडावून तपासणी केली असता त्यात केवळ २५ बॅग युरीया खताच्या आढळून आल्या. त्यानुसार गुण नियंत्रण अधिकाऱ्यांनी पुढील आरसीएफ (RCF)कंपनीच्या युरीया खताचा पुरवठा होताच माझ्यासमक्ष परिसरातील शेतकऱ्यांना वितरीत करण्याची ताकीद दिली.त्यानुसार शुक्रवार ५ सप्टेंबर रोजी आरसीएफ (RCF)कंपनीच्या युरीया खताच्या २८० बॅग म्हणजेच १२.६० मे.टनाचा पुरवठा होताच परत गुण नियंत्रण अधिकारी अभिषाली येरमे यांनी प्रत्यक्ष गीलगाव येथील महंत कृषी केंद्रात जाऊन परिसरातील शेतकऱ्यांना पोलीस प्रशासनास पाचारण करून काल,शनिवार ६ सप्टेंबर रोजी युरीया खताचे वाटप केले.कृषी केंद्र चालकाच्या मनमानीला चाप बसवून परिसरातील शेतकऱ्यांना युरीया खत उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांनी गुण नियंत्रण अधिकाऱ्यांचे आभार मानले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!