- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-आता फक्त पुरुष वर्गच नाही तर महिला वर्गही एकदम आगे बढवू लागल्या आहेत.असा कोणताच क्षेत्र सुटलेला नाही की महिला मंडळी मागे राहिलेल्या आहेत. त्यातच काही महिला अनेकांच्या चिट्टीवरून हात फिरविण्यातही माहिर झाल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे.अश्याच प्रकारे एका ४२ वर्षीय महिलेने शासकीय नोकरीवर असल्याची बतावणी करून बँकेला हुबेहुब कागदपत्रे सादर केली आणि तब्बल सहा लाख रुपयांचे कर्ज घेतले. अश्यातच बँकेला ९५ हजार रुपयांचे हफ्तेही भरले.मात्र,उर्वरित रकमेचे हफ्ते चुकवून पोबारा केल्याची घटना उघडकीस तक्रारीवरून संबंधित महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.माधुरी सुधीर ठाकरे वय ४२ वर्षे,रा.एकता नगर,बुटीबोरी असे आरोपी महिलेचे नाव असून तिने जुलै २०२३ मध्ये कोटक महिंद्रा बँकेकडून सहा लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतले होते.कर्ज घेतांना तिने हिंगण्यातील टाकळघाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कनिष्ठ लिपीक पदावर कार्यरत असलेली कागदपत्रे बँकेला दिली होती.कर्ज मिळाल्यानंतर तिने ९५ हजार रुपये भरले होते.मात्र,त्यानंतर तिने हफ्ते भरणे बंद केले. त्यामुळे बँकेचे कलेक्शन मॅनेजर विवेक बाबलाजी भुडे वय ३३ वर्षे यांनी तिचे तपशील तपासले.त्यानुसार ते अगोदर तिच्या पत्त्यावर गेले.मात्र,तेथे ती आढळली नाही.त्यामुळे तिने दावा केल्याप्रमाणे तिच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचले.मात्र,तिथेही माधुरी ठाकरे नावाची कोणतीही लिपीक काम करत नसल्याचे त्यांना सांगण्यात आल्याने धक्काच बसला. त्यानुसार महिलेने बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज उचलल्याचे स्पष्ट झाल्याने अखेर बँकेचे कलेक्शन मॅनेजर विवेक बाबलाजी भुडे यांच्या तक्रारीवरून माधुरी ठाकरेच्या विरोधात पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- Advertisement -

