Thursday, September 10, 2026
Homeगडचिरोलीसुरक्षा दल आणि नक्षल चकमक; चार नक्षलवाद्यांना कंठस्नान.. - तीन महिला नक्षली...

सुरक्षा दल आणि नक्षल चकमक; चार नक्षलवाद्यांना कंठस्नान.. – तीन महिला नक्षली तर एका पुरुष नक्षलीचा समावेश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गडचिरोलीच्या महाराष्ट्र व छत्तीसगडच्या नारायणपूर सीमेलगत असलेल्या भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगल परिसरात नक्षलवादी दबा धरून बसल्याची गोपनीय माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाल्याने अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन एम.रमेश यांचे नेतृत्वात सी-६० पथकाच्या १९ तुकड्या व केंद्रीय राखीव दलाच्या जलद गती टीमच्या(QAT)दोन तुकड्या कोपर्शी  जंगल परिसरात मोहीम राबविण्यास सज्ज असतांनाच दोन दिवसांपासून दक्षिण गडचिरोली भागात मुसळधार पावसामुळे मोहीम काहीकाळ थांबविण्यात आली.अश्यातच आज,बुधवार २७ ऑगस्ट रोजी नक्षलवादी व जवानांमध्ये तब्बल आठ तास चकमक उडाली.चकमकीत तीन महिला नक्षली तर एका पुरुष नक्षलवाद्यांना जवानांनी यमसदनी धाडले आहे.त्यातच घटनास्थळावरून एक एसएलआर (SLR)रायफल,दोन इन्सास (INSAS) रायफल्स आणि एक ३०३ रायफल हस्तगत करण्यात आली आहे.गडचिरोली जवानांचे पथक जंगल परिसरात पोहोचताच नक्षलवाद्यांनी पथकाच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली.गोळीबाराला प्रत्युत्तर देतांना जवांनानाही गोळीबार करावा लागला.तब्बल आठ तास चकमक सुरू होती.या अभियानात तब्बल चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली दलास यश मिळाले असून मृत नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

अजब लाचेची गजब कहाणी..! दोन्ही हातांच्या दहा बोटांचा इशारा करून मागितली १० हजाराची लाच.. – पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  छत्रपती संभाजीनगर :-राज्याच्या विविध भागात सरळ-सरळ तोंडी बोलणी करून अनेकजण लाच घेतांना व एसीबीच्या जाळ्यात अडकतांना दिसून येतात.पण, नुकतेच छत्रपती संभाजीनगर(पूर्वीचे औरंगाबाद)शहरात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!