- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात येत्या,बुधवार २७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी म्हणजेच गणपती सणाच्या उत्सवास प्रारंभ होत आहे.उत्सवाच्या काळात शासकीय कर्मचाऱ्यांना आर्थिक चणचण भेडसावू नये,याकरीता शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांच्या पागाराबाबत मोठा निर्णय घेतला आहे.घेण्यात आलेल्या निर्णयात १ सप्टेंबर रोजी होणारे अधिकारी, कर्मचारी यांचे वेतन(पगार) हे येत्या,मंगळवार २६ ऑगस्ट रोजी देण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे.यात जिल्हा परिषद,मान्यता प्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था,अकृषि विद्यापीठे, कृषी विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी व कर्मचारी तसेच निवृत वेतनधारक,कुटुंब निवृत वेतनधारक यांनाही सदरचा निर्णय लागू राहणार असल्याने सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना तब्बल पाच दिवस आधीच पगार मिळणार आहे.याबाबत शासनाच्या वित्त विभागाकडून आज,गुरुवार २१ ऑगस्ट रोजी शासन निर्णय काढण्यात आला आहे.
- Advertisement -

