Monday, September 7, 2026
Homeगडचिरोलीराष्ट्रगीतानंतर राज्यगीत गायन बंधनकारक; १५ ऑगस्ट देशभक्तीपर गीतांनी साजरा करा- शालेय शिक्षणमंत्री...

राष्ट्रगीतानंतर राज्यगीत गायन बंधनकारक; १५ ऑगस्ट देशभक्तीपर गीतांनी साजरा करा- शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी येत्या १५ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर कवायती सादर करून उत्साहात स्वतंत्र दिन साजरा करण्याचे व या कार्यक्रमांमध्ये स्थानिक नागरिक व पालक यांची प्रत्यक्ष उपस्थिती राहावी, यासाठी शाळांनी योग्य नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.शालेय कार्यक्रमांदरम्यान राष्ट्रगीतानंतर राज्यगीत गायन (गर्जा महाराष्ट्र माझा)बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.त्याचबरोबर,जिल्हा परिषद शाळांमध्ये शैक्षणिक आणि मूलभूत सुविधा अधिक बळकट करण्यावर भर देतांना त्यांनी शुद्ध पिण्याच्या पाण्याची उपलब्धता,स्वच्छ व सुसज्ज स्वच्छतागृह,शालेय इमारतींची दुरुस्ती किंवा नव्या इमारतींचे बांधकाम,ई-सुविधा आणि संगणक लॅब,विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालय आणि खेळाचे मैदान या क्षेत्रांमध्ये लक्ष देण्याचे निर्देश दिले.या सुविधा उभारण्यासाठी कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व निधी (CSR Fund) मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी सांगितले.
आज,गुरुवार ७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्हा परिषद सभागृहात नियोजित असलेल्या जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता आढावा बैठकीसाठी ते उपस्थित होते. मात्र,गडचिरोली-आरमोरी मार्गावर झालेल्या दुर्दैवी अपघातात चार युवकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर,मंत्री दादाजी भुसे यांनी शोक व्यक्त करत ही बैठक तहकूब केली.त्यांनी जाहीर केले की,या बैठकीचा आढावा पुढील दौऱ्यात घेण्यात येईल.यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार,शिक्षण उपसंचालक माधुरी सावरकर, शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे व बाबासाहेब पवार तसेच सर्व विस्तार अधिकारी व जिल्हा परिषदेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या सणावर महागाईचे सावट..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधवांच्या सुख-दुःखात वर्षभर खांद्याला-खांदा लावून राबणाऱ्या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा बैलपोळा सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे.मात्र,यंदा पोळ्याच्या उत्साहावर...

मॉन्सूनचा प्रभाव कमी; आजपासून सूर्य आग ओकण्याच्या तयारीत..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-काही दिवसांपूर्वी विदर्भात सक्रिय असलेला मान्सून परतीच्या मार्गावर असल्याने आज,सोमवार ७ सप्टेंबरपासून सूर्य आग ओकून तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता प्रादेशिक...

माजी सरपंचांनाच प्रशासक म्हणून कायम ठेवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींवर तत्कालीन सरपंच हे प्रशासक म्हणून नेमण्यात आले होते.अश्यातच माजी सरपंचांच्या सहा महिन्यांच्या काही प्रशासक पदाची...

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!