Thursday, September 3, 2026
Homeगडचिरोलीआकांक्षित जिल्हा पुरस्कार श्रेणीत गडचिरोली जिल्ह्यासह अहेरी,भामरागड तालुका ‘ब्रॉंझ’ पदकाने सन्मानित..

आकांक्षित जिल्हा पुरस्कार श्रेणीत गडचिरोली जिल्ह्यासह अहेरी,भामरागड तालुका ‘ब्रॉंझ’ पदकाने सन्मानित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-नीती आयोगाद्वारे आकांक्षित जिल्हा व तालुका विकासासाठी सुरू करण्यात आलेल्या संपूर्णता अभियानात गडचिरोली जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी करत जिल्हा तसेच अहेरी व भामरागड तालुक्यांसाठीही ब्राँझ पदक मिळविले आहे.या कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘ब्रॉंझ’ पदकाने सन्मानित करण्यात आले.
आयआयएम नागपूर येथे २ ऑगस्ट व ३ ऑगस्ट रोजी आयोजित महसूल परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी गौरव सोहळा पार पडला.महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार,अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा,अप्पर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे,मुख्यमंत्री यांचे सचिव श्रीकर परदेशी, सर्व विभागीय आयुक्त व अन्य मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.या सोहळ्यात आकांक्षित जिल्हा पुरस्कार श्रेणीत गडचिरोली जिल्ह्याला ‘ब्रॉंझ’ पदक मिळाले तर आकांक्षित तालुका पुरस्कारात गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आणि भामरागड या दोन्ही तालुक्यांनाही ‘ब्रॉंझ’ पदकाने सन्मानित करण्यात आले.
‘संपूर्णता’ अभियान हा नीती आयोगाचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम असून ज्याचा उद्देश देशातील मागासलेल्या जिल्ह्यांमध्ये सर्वांगीण विकास घडवून आणणे आहे.जिल्ह्याने ९ ते ११ वयोगटातील बालकांचे लसिकरण,शाळेत विद्युत सुविधा,शाळा सुरू झाल्यावर एक महिन्याच्या आत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देणे यात १०० टक्के उद्दिष्ट प्राप्त केले.तर तालुकास्तरावर अहेरीत मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी,गरोदर मातांना पूरक पोषण आहार,माती परीक्षण करून मृदा आरोग्य कार्ड बनविणे यात तसेच भामरागड तालुक्यात मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी सोबतच स्वयंसहायता बचत गटांना खेळते भांडवल उपलब्ध करून देणे या बाबींमध्ये १०० टक्के उद्दिष्ट प्राप्ती केली आहे.गडचिरोली जिल्ह्याने या अभियानात केलेल्या प्रयत्नांमुळे हा सन्मान मिळाला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!