Sunday, September 6, 2026
Homeब्रम्हपुरीअवैध रेतीचा पकडलेला ट्रॅक्टर तहसील कार्यालयातून गायब; आता होणार मोठी कारवाई..!

अवैध रेतीचा पकडलेला ट्रॅक्टर तहसील कार्यालयातून गायब; आता होणार मोठी कारवाई..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-पूर्वी अवैध रेतीचा ट्रॅक्टर वा इतर साधने पकडल्यास केवळ शास्तीची कार्यवाही करून सोडण्यात येत होते.त्यामुळे अवैध रेतीचे सर्वत्र उधाण येऊन मोठ्या प्रमाणावर शासनाच्या महसुलास चुना लावल्या जात होता व गुन्हेगारी वाढून रेती तस्कर ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने शासनाने यावर आळा घालण्यासाठी शासन परिपत्रक जारी केले आहे.त्यामुळे आता शास्तीची रक्कम तर भरणा करावीच लागेल,अश्यातही विविध कलमान्वये फौजदारी गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे.अश्यातच वारंवार एकच कृत्य केल्यास स्थानबद्ध किंवा जिल्ह्याच्या बाहेर तडीपारही करण्यात येत आहे.नुकतेच भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील चार रेती तस्करांना तडीपार करण्यात आले आहे.त्यातच आता ब्रम्हपुरी तहसील कार्यालयातून अवैध रेतीचा पकडलेला ट्रॅक्टर रेती तस्करांनी पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.त्यामुळे गुन्हा तर दाखल होणारच आणि जोरदार फटकेही बसणार असल्याची माहिती आहे. २ ऑगस्टला गुरुवारच्या रात्री महसूल विभागाच्या पथकाने अहेर नवरगाव येथील मुख्य रस्त्यावर रेतीने भरलेला एक ट्रॅक्टर जप्त केला.ट्रॅक्टरसह पंचनामा करून तो रात्री २ वाजता तहसील कार्यालयात जमा करण्यात आला होता.मात्र,थोड्याच वेळात महसूल अधिकारी कार्यालयातून गेल्यानंतर,अज्ञात रेती तस्करांनी ट्रॅक्टर लंपास केल्याची माहिती पुढे आली आहे.त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे ब्रम्हपुरीचे उपविभागीय अधिकारी परवनी पाटील यांनी सांगितले आहे.
  • अशी असणार फौजदारी कारवाई👇
फौजदारी गुन्हे दाखल करतांना महाराष्ट्र जमीन महसुल संहिता,१९६६– (उदा.कलम ४८ (७) व ४८ (८)),भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस.),२०२३-(उदा.कलम ३०३(२),३१०(२),१३२,३५१(२),११८(१), ११५(२), ३३२(C),३(५),पर्यावरण संरक्षण अधिनियम,१९६६-(उदा.कलम ९ व १५),खाण आणि खनिज अधिनियम,१९५८– (उदा.कलम ३,४ व २१),सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंध अधिनियम-(उदा.३ व ७) यामधील विविध कलमाच्या अनुषंगाने गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही पोलीस अधिकारी,महसुल अधिकारी, कर्मचारी व संबंधित सक्षम अधिकारी करणार आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!