Thursday, September 3, 2026
Homeनागपूरदारू अंगात संचारली अन् नागरिकांना कट मारत कार झाडावर आदळली..! - नागरिकांनी...

दारू अंगात संचारली अन् नागरिकांना कट मारत कार झाडावर आदळली..! – नागरिकांनी सैन्य दलातील जवानास चांगलेच धुतले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-चांगल्या कार्यासाठी कुणीही सलाम ठोकणार, पण वाईट कृत्यासाठी समोरील व्यक्ती कोण? हे कुणीही विचारणार नाही.अश्याच प्रकारे काल रविवारच्या रात्री सव्वा आठच्या सुमारास भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या मद्यधुंद जवानाने दारूच्या नशेत आय-टेन कार चालवतांना गावी जात असतांना थरकाप उडवला. त्याने तब्बल २५ ते ३० नागरिकांना गाडीने कट मारत गोंधळ घातला.यात सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही.मात्र, घटनेनंतर ग्रामस्थांनी पाठलाग करत त्याला पकडून चांगलेच धुतले.हर्षपाल महादेव वाघमारे वय ४० वर्षे रा.हमलापुरी,ता.रामटेक,जि.नागपूर असे जवानाचे नाव आहे.हा भारतीय सैन्य दलात आसाम येथे कार्यरत असून काही दिवसांपूर्वी सुटीवर गावी आला होता.त्याला दारूचे व्यसन असल्याचे सांगण्यात येते.
रविवारी रात्री दारूच्या नशेत त्याने आपली एम.एच.४०-सी.ए.६३७७ क्रमांकाची आय टेन कार चालवण्याचा प्रयत्न केला.गावी हमलापुरीकडे जातांना नगरधन गावातील साई मंदिर व दुर्गा चौक मार्गे त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि त्याने रस्त्यावरील २५ ते ३० लोकांना कट मारून जीवघेणा धोका निर्माण केला.पळ काढण्याच्या प्रयत्नात त्याची कार हनुमान मंदिर परिसरात झाडावर आदळली आणि नंतर रस्त्यालगतच्या नाल्यात जाऊन पडली.घटनास्थळी संतप्त ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग करत पकडुन चांगलेच बदडवले.यानंतर रामटेक पोलिसांना या घटनेची माहिती दिली.तातडीने पोलिस घटनास्थळी दाखल झाले.मद्यधुंद अवस्थेत असलेल्या हर्ष वाघमारेला ताब्यात घेत रामटेक येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आले. पुढील तपास रामटेकचे ठाणेदार रवींद्र मानकर  करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!