- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-नागपूरच्या चिटणवीस सेंटरमध्ये विसाव ह्युमन राईट्स अँड इन्फॉर्मेशन राईट्स असोसिएशन (VISAV Human Right and Information Right Association)तथा दर्पण पत्रकार अँड संपादक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज,सोमवार ४ ऑगस्ट रोजी विविध सामाजिक उपक्रम,लोकहितार्थ कार्य आणि ग्रामीण भागातील जनजागृतीसाठी केलेल्या भरीव कार्याची दखल घेऊन समाज भूषण पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यात समाजकार्य व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे देसाईगंज ओबीसी काँग्रेस तालुकाध्यक्ष कैलास वानखेडे यांना आज सोमवारी पार पडलेल्या कार्यक्रमात समाज भूषण पुरस्कार प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर,कार्यकर्ते तथा पत्रकार उपस्थित होते.कैलास वानखेडे यांनी आपल्या कार्यातून समाजहिताचा ध्यास घेत लोकशाही मूल्यांना बळकट करणारे कार्य केले. त्यांच्या या सन्मानामुळे देसाईगंजचेच नाही तर गडचिरोली जिल्ह्याचा सुद्धा गौरव झाला आहे. पुरस्कार प्रदान करतेवेळी नागपूर येथील आमदार संदीप जोशी,माधवो राजे भोसले,हरी शंकर शुक्ला, सुप्रसिद गायक हाजी मजीद शोला यांच्येसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
- Advertisement -

