Thursday, September 3, 2026
Homeगडचिरोलीउपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी रेती तस्करांच्या आवळल्या मुसक्या..! - देसाईगंज-कोंढाळा मार्गावर धडक कारवाई;...

उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी रेती तस्करांच्या आवळल्या मुसक्या..! – देसाईगंज-कोंढाळा मार्गावर धडक कारवाई; ३६ लाख ७७ हजाराचा मुद्देमाल जप्त.. – सहा आरोपी अटकेत; एकजण फरार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्यात अवैध रेती चोरीने सपाटा चालवला होता.रात्री नाही तर दिवसाढवळ्या अवैध रेतीच्या उत्खननासह वाहतूक करून शासनाच्या महसुलास कोट्यवधी रुपयांचा चुना लावण्यात आला.यात अनेकांनी हात ओले करून ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेणे सुरू होती.अश्यातच गडचिरोली जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी यावर आवर घालून लगाम लावले आणि निद्रावस्थेत गेलेले काही अधिकारी,कर्मचारी खळबळून जागे झाले.अश्यातही काही रेती तस्कर ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने चक्क कुरखेडा उपविभागीय पोलिस अधिकारी  (एसडीपीओ)यांनी शनिवार १९ जुलैच्या मध्यरात्री अवैध रेती उत्खनन व वाहतूक प्रकरणी मोठी कारवाई केल्याने रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत.धडक कारवाईत एकूण ३६ लाख ७७ हजाराचा मुद्देमाल जप्त करून सहा आरोपींना अटक करण्यात आली.तर एक आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती देसाईगंज पोलिसांनी दिली.
देसाईगंज तहसीलच्या मौजा-कोंढाळा येथून देसाईगंज मार्गे रेती तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती कुरखेडा उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले यांना मिळाली.या माहितीच्या आधारे पथकासह सापळा रचला आणि रेती तस्कर अलगद जाळ्यात अडकले.धडक कारवाईत २५ लाख रुपये किंमतीचा टाटा कंपनीचा पांढरा,निळ्या रंगाचा टिप्पर क्रमांक-एमएच ३३ टि ५४५४,रुपये ५ लाख किंमतीचा स्वराज ७३३ एफ ई कंपनीचा पांढरा लाल रंगाचा ट्रॅक्टर व टॉली विना क्रमांकाची,६ लाख रुपये किंमतीचा जॉन डिअर ५३१० कंपनीचा हिरव्या रंगाचा टॅक्टर व टॉली विना क्रमांकाची,२१ हजार रुपये किंमतीची ७ ब्रास रेती आणि ५६ हजार रुपये किंमतीचे पाच अँड्रॉइड मोबाईल असा एकूण ३६ लाख ७७ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
  • अटक करण्यात आलेले आरोपी👇
१.मंगेश विठोबा लेनगुरे वय ३० वर्षे,रा.गांधीनगर ता.देसाईगंज,जि.गडचिरोली.
२.अविनाश हिरालाल आंबाडारे वय २३ वर्षे,रा.सांवगी,ता.देसाईगंज,जि.गडचिरोली.
३.विशाल यंशवत बगमारे वय २६ वर्षे, रा.उसेगाव,ता.देसाईगंज जि.गडचिरोली.
४.लोकेश पुरुषोत्तम गायकवाड वय २२ वर्षे,रा.मोहटोला/किन्हाळा,ता.देसाईगंज,जि. गडचिरोली.
५.राजकुमार लालाजी आंबाडारे वय ३२ वर्षे,रा.कोंढाळा,ता.देसाईगंज,जि.गडचिरोली.
६.आशिष बालाजी शेंडे वय ३० वर्षे,रा.गांधीनगर,ता. देसाईगंज,जि.गडचिरोली.
असे अटकेतील आरोपींची नावे असून शैलेश दिगांबर नाकाडे वय ३० वर्षे रा.उसेगाव,ता.देसाईगंज, जि.गडचिरोली हा आरोपी अद्याप फरार आहे.सातही आरोपींवर अपराध क्रमांक-३८२/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२),३(५) अंतर्गत देसाईगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास देसाईगंज पोलीस करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!