- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-आरोग्य पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलत प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियानांतर्गत महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अत्याधुनिक ‘क्रिटिकल केअर ब्लॉक’ उभारण्यात येत असल्याने आता गंभीर रुग्णांसाठी जिल्ह्यातच आयसीयूसह तातडीच्या उपचारांची सुविधा मिळणार आहे.त्यामुळे तातडीच्या उपचारासाठी दुसऱ्या जिल्ह्यांत होणाऱ्या भटकंतीवर थांबा मिळणार आहे.
सध्या नागपूर,नाशिक,पुणे,सोलापूर,नांदेड,बीड, अकोला,जालना आणि लातूरमध्ये काम सुरू आहे.तर गोंदिया,सिंधुदुर्ग,पनवेल (ठाणे)आदी जिल्ह्यांमध्ये निविदा प्रक्रिया किंवा कामाचे आदेश जारी करण्यात आले आहेत.सार्वजनिक आरोग्य विभागाने म्हटले की,५ ते २० लाख लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये ५० बेड्सचे,तर २० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये शंभर बेड्सचे ब्लॉक्स तयार होतील.या ब्लॉक्समध्ये आयसीयू,एचडीयू, आयसोलेशन वॉर्ड,डायलिसिस, ऑपरेशन थिएटर,लेबर रूम,माता-बालक कक्ष आणि तातडीच्या सेवा यांचा समावेश असेल.प्रत्येक बेडसाठी ८५ चौरस मीटर जागा निश्चित करण्यात आली आहे.या ब्लॉक्समध्ये अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे, प्रशिक्षित डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफही तैनात केले जाणार आहेत.त्यामुळे उपचारांचा दर्जा आणि वेळेवर सेवा मिळण्याचे प्रमाण वाढणार असून राज्याच्या ग्रामीण भागात देखील दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी,हा सरकारचा उद्देश आहे.वर्षअखेरीपर्यंत हे सर्व क्रिटिकल केअर ब्लॉक्स कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे.
- Advertisement -

