- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यातील वडेगाव ते वेलसाखरा फाटा रोडलगत पोल्ट्री फार्म आहे.या ठिकाणी बाहेरगावातील काही मजूर कामावर आहेत.त्यांची मुले रोडलगत खेळत होती.अश्यातच खेळता-खेळता ९ वर्षीय चिमुकला रोड ओलांडत असतांना अचानकपणे सुसाट वेगाने आणि निष्काळजीपणाने चालकाने ओमनी कार पळवीत जोरदार धडक दिली.यात तो गंभीररीत्या जखमी झाला.ओमनी कारची धडक लागल्यानंतर चालक घटनास्थळावरून ओमनीसह पसार झाला.गंभीर जखमी चिमुकल्यास त्याच्या आई-वडिलांनी उमरेड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र,तपासणीअंती डॉक्टरांनी मृत घोषित केले.सदरची घटना उमरेड तालुक्यातील वडेगाव येथे काल रविवारी सकाळच्या सुमारास घडली.शिवम अण्णाजी आत्राम वय ९ वर्षे असे मृत बालकाचे नाव आहे.प्रकरणी उमरेड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम २८१,१२५ (अ) (ब),१०६ (१),सहकलम १८४,१३४/१८७ मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा नोंदविला असून घटनास्थळावरून पसार झालेल्या कार चालकाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
- Advertisement -

