Monday, July 27, 2026
Homeनागपूरनागपूरच्या मेडिकलमध्ये नवजात बालकांच्या मृत्यूंचे वाढले प्रमाण- माहिती अधिकारातून धक्कादयक माहिती समोर

नागपूरच्या मेडिकलमध्ये नवजात बालकांच्या मृत्यूंचे वाढले प्रमाण- माहिती अधिकारातून धक्कादयक माहिती समोर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नागपूर :- नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय म्हणजेच मेडीकलमध्ये गेल्या वर्षभरात २३७ नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे.मेडीकलमध्ये जन्मलेल्या एकूण नवजात बालकांच्या तुलनेत २०२२ मध्ये २.४६ टक्के नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे.तर गेल्या तीन वर्षांत ६१८ नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे.माहितीच्या अधीकारांतर्गत हे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.कोट्यवधी रुपये खर्च करुनही राज्य सरकारला नवजात बालकांचे मृत्यू रोखण्यात अपयश येत आहेत.नागपूर मेडीकलमध्ये २०२० या वर्षांत ९३५३ बालकांचा जन्म झाला,यापैकी २०५ बालकांचा मृत्यू झाला आहे.

२०२१ या वर्षांत ७४९३ बालकांचा जन्म झाला, यापैकी १७६ बालकांचा मृत्यू झाला आहे.तर २०२२ या वर्षांत ९६३० बालकांचा जन्म झाला,यापैकी २३७ बालकांचा मृत्यू झाला आहे.२०२० ते २०२२ या तीन वर्षांत नागपूर मेडीकलमध्ये तब्बल ६१८ नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे.कमी असलेले बाळांचे वजन,कमी दिवसांचे बाळ,जन्मजात इन्फेक्शन आणि न्यूमोनिया ही बाळांच्या मृत्यूची प्रमुख कारणे आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!