Wednesday, September 2, 2026
Homeगडचिरोलीउलट्या बातमीचा परिणाम; ती बातमी तशी नव्हे..! वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी हरणाची शिकार...

उलट्या बातमीचा परिणाम; ती बातमी तशी नव्हे..! वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी हरणाची शिकार केली नाही तर.. – वनविभागाच्या तत्पर कारवाईमुळेच शिकार प्रकरण उघडकीस; वनविभागाचा खुलासा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-काही प्रसारमाध्यमांमधून प्रसारित करण्यात आलेल्या “वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केली हरणाची शिकार” या मथळ्याखालील बातम्या पूर्णपणे तथ्यहीन आणि भ्रामक असल्याचे स्पष्ट करीत आज,शुक्रवार ११ जुलै रोजी वनविभागाने त्याचे खंडन केले आहे.या प्रकरणात वनविभागाचा कोणताही अधिकारी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या सामील नसून,उलट वनविभागाच्या तत्पर कारवाईमुळेच हे शिकार प्रकरण उघडकीस आले असल्याची माहिती आलापल्लीच्या उपवनसंरक्षक दिपाली तलमले यांनी दिली आहे.
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार,गुरुवार १० जुलै २०२५ रोजी आलापल्ली (ता.अहेरी) येथे मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वनविभागाने कारवाई केली.या कारवाईदरम्यान एफडीसीएम कॉलनी, नागेपल्ली येथील रेखा दिवाकर वनकर यांच्या घरात शिजवलेले मांस आढळून आले.चौकशीत त्यांनी ते चितळाचे मांस असल्याची कबुली दिली.हे मांस संजय गोविंदा कोटरंगे याच्याकडून मिळाल्याचे त्यांनी सांगितले.पुढील तपासात कोटरंगे यानेही स्वतः गुन्हा केल्याची कबुली दिली.
या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींची नावे समोर आली आहेत.त्यात रेखा दिवाकर वनकर वय ५५ वर्षे,  संजय गोविंदा कोटरंगे वय २५ वर्षे,अनिल राजन्ना बोलेम वय ४० वर्षे,भानय्या बुचय्या जंगीडवार वय ६२ वर्षे,अमोल गणपत ठाकरे वय ३५ वर्षे यांचा समावेश आहे.या सर्व आरोपींनी चितळाचे मांस खरेदी किंवा विक्री केल्याचे उपविभागीय वन अधिकाऱ्यांसमोर कबूल केले आहे.त्यामुळे त्यांच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम,१९७२ अंतर्गत वनगुन्हा क्रमांक ८१२६/२०३१४६ दिनांक-९ जुलै २०२५ रोजी नोंदविण्यात आला.आरोपींना अहेरी येथील प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले असता,न्यायालयाने त्यांना वन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.सदरची कारवाई मुख्य वनसंरक्षक रमेश कुमार तसेच उपवनसंरक्षक दिपाली तलमले यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय वन अधिकारी शिशुपाल पवार,वनक्षेत्रपाल नारायण इंगळे, गौरव गणवीर,वनपाल सहारे, गोवर्धन, बुद्धावार,तुराणकर आणि वनरक्षक राव व दहागावकर यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
वन विभागाच्या वतीने आवाहन👇
कोणताही वन्य प्राणी अथवा पक्षी पाळणे,विकणे, खरेदी करणे,शिकार करणे किंवा त्यांचे अवयव बाळगणे हे वन्यजीव संरक्षण अधिनियम,१९७२ नुसार गंभीर गुन्हा आहे.नागरिकांनी अशा प्रकारांची माहिती मिळाल्यास तत्काळ १९२६ (Hello Forest) या टोल फ्री क्रमांकावर किंवा जवळच्या वनविभाग कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!