Friday, September 11, 2026
Homeगडचिरोलीनक्षल्यांकडून स्मारक सभा व आंदोलनांचे आवाहन.. - जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी आदेश...

नक्षल्यांकडून स्मारक सभा व आंदोलनांचे आवाहन.. – जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी आदेश लागू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-छत्तीसगड राज्याच्या अबुजमाड परिसरात २७ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.त्यामुळे नक्षलवादी बिथरले असून त्यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर नक्षलवादी संघटनांनी ११ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान स्मारक सभा व आंदोलनांचे आवाहन केले असल्याने जिल्ह्यात अनुचित प्रकार घडू नये व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावा,यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात १० जुलै रोजी मध्यरात्रीपासून २४ जुलैच्या रात्रीपर्यंत जमावबंदी लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत.
आदेशानुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अंतर्गत शस्त्रे,दगड,स्फोटके, भडकाऊ साहित्य बाळगणे,घोषणा करणे,सभा घेणे, पाच किंवा अधिक व्यक्तींनी एकत्र येणे,मिरवणुका काढणे यावर बंदी घालण्यात आली आहे.यामध्ये सार्वजनिक ठिकाणी कोणतीही आंदोलनात्मक कृती करण्यासाठी प्रशासनाची पूर्वपरवानगी आवश्यक आहे.सदर जमावबंदी आदेश गडचिरोली जिल्ह्याच्या संपूर्ण क्षेत्रात लागू राहील,असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माता व नवजात बालिकेचे प्राण वाचविण्यात वैद्यकीय पथकाला यश.. – मातामृत्यू कमी करण्यासाठी वेळेवर नोंदणी व उपचार घेण्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील कालीअम्मल हॉस्पिटल येथे अतिजोखमीच्या गर्भधारणेतील अत्यंत गंभीर व गुंतागुंतीच्या प्रकरणात वेळेवर निदान,रक्तघटकांचा पुरवठा,आवश्यक उपचार व तातडीची...

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!