Tuesday, July 28, 2026
Homeकोंढाळाकोंढाळा येथील माजी सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू..

कोंढाळा येथील माजी सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथील माजी सेवानिवृत्त कर्मचारी केशव शेंडे यांचा वयाच्या ७० व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना काल,सोमवार ३० जून रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.केशव शेंडे हे आरोग्य विभागाच्या हत्तीरोग फायलेरिया विभागातून आरोग्य सहाय्यक पदावरून धानोरा येथून काही वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते.
केशव शेंडे यांना शनिवारी २८ जूनच्या रात्री  प्रकृतीवस्थामुळे ब्रम्हपुरीच्या वंजारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.तिथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर रविवार २९ जून रोजी पुढील उपचाराकरिता सायंकाळच्या सुमारास नागपूरच्या अर्निजा हार्टकेअर या खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले.रविवारच्या रात्री उपचारानंतर त्यांना बरे वाटू लागले होते.अश्यातच काल सोमवारी सकाळच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(शरद पवार गट) देसाईगंज तालुकाध्यक्ष क्षितिक उके यांनी स्वतः हॉस्पिटलमध्ये जाऊन केशव शेंडे यांची भेट घेत प्रकृती बाबत विचारणा केली असता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती व काहीकाळ त्यांनी कुटुंबीयांसोबत व्हिडिओ कॉलद्वारे संभाषणही केले होते.मात्र,दुपारी दीड वाजेच्या सुमारास अचानकपणे केशव शेंडे यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. यात त्यांची प्राणज्योत मालवली.केशव शेंडे हे मृदभाषी,शांत व मनमिळावू स्वभावाचे होते.गावातील सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा.आरोग्य सहाय्यक पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी शेती कसण्यावर भर दिला होता.शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवून शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन करायचे.केशव शेंडे यांच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले,सून,नातवंड असा आप्त परिवार आहे.आज, मंगळवार १ जुलै रोजी दुपारच्या सुमारास त्यांच्या स्वगावी कोंढाळा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा इशारा; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी...

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!