Saturday, October 24, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज काँग्रेस कमिटीतर्फे शालेय विद्यार्थ्यांना नोटबुकचे वितरण..

देसाईगंज काँग्रेस कमिटीतर्फे शालेय विद्यार्थ्यांना नोटबुकचे वितरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत
नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा व जुनी वडसा येथील शालेय विद्यार्थ्यांना मोफत नोटबुकचे वितरण  करून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी जागृती निर्माण करण्यात आली.प्रसंगी देसाईगंज काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले म्हणाले की,विद्यार्थ्यांनी शिक्षणाची कास धरावी.समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी शिक्षण हा सर्वात प्रभावी मार्ग आहे.हा उपक्रम म्हणजे केवळ नोट बुकांचे वाटप नाही,तर विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्याची शिदोरी देण्याचा प्रयत्न होता.नोटबुक मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर काहीकाळ आनंद फुलून आले.नोटबुकचे वितरण करतेवेळी शाळेचे मुख्याध्यापक चौहान,ओबीसी काँग्रेस तालुकाध्यक्ष कैलाश वानखेडे,युवक काँग्रेस शहराध्यक्ष विजय पिल्लेवान,हाके,पठाण,पटले,अनिल मुळे सह शाळेचे शिक्षकवृंद उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एटापल्लीतील ३० गावांत जलसुरक्षा व शाश्वत उपजीविकेसाठी कार्यक्रम; ९६० कोटी लिटर अतिरिक्त जलक्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील ३० आदिवासी गावांमध्ये जलसुरक्षा बळकट करणे,शेतीची उत्पादकता वाढविणे आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी...

नागपूर विभाग पदवीधर निवडणूक; गडचिरोली जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी सर्वाधिक.. -विभागाची सरासरी ६४.७६ टक्के..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत प्राप्त अहवालानुसार दुपारी ४ वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ७२.९५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण...

रस्त्याच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल; काम पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी परिसरातील खांदला–चिरेपल्ली आणि चिरेपल्ली–आलापल्ली या एकूण २२ किलोमीटर रस्त्याच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. त्यांच्या...

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी प्रसिध्द..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ योजना सुरु केली आहे.या योजनेतंर्गत १ एप्रिल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!