- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये दुसऱ्यांदा जिल्हास्तरीय गट क आणि गट ड संवर्गातील सरळसेवेची पदे भरण्यासाठी सुधारित आरक्षण व बिंदुनामावली लवकरच निश्चित होणार असून नुकत्याच मंत्रालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.यात चंद्रपूर,गडचिरोलीसह रायगड,पालघर, नाशिक,धुळे,नंदुरबार व यवतमाळ या आठ जिल्ह्यांचा समावेश आहे.मंत्रिमंडळास अहवाल सादर करण्यासाठी महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली २३ मे २०२५ रोजी मंत्रिमंडळ उपसमिती गठित करण्यात आली आहे.या समितीच्या बैठका जवळपास पार पडल्या असून लवकरच ‘एसईबीसी’ प्रवर्गाला यवतमाळ,चंद्रपूर, गडचिरोली,रायगड,नाशिक,धुळे,पालघर,नंदुरबार या आदिवासीबहुल आठ जिल्ह्यांत गट क आणि गट ड भरतीत १० टक्के आरक्षण मिळण्याची शक्यता बळावली असल्याने एसईबीसी(socially and educationally Backword class)म्हणजेच सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गातील तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी भरतीचा लाभ नोकरीस इच्छुक असणाऱ्या हजारो नागरिकांना होणार आहे.
- Advertisement -

