- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील दर्पणगुडा गावावरून घोटकडे ट्रॅक्टरवर बसून जात असतांना वाटेतच ट्रॅक्टरवरून तोल गेला.तोल जाताच खाली पडल्याने चालत्या ट्रॅक्टरचे चाक डोक्यावरून गेल्याने २६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. अपघातात घोट येथील नीलेश दीपक सुरजागडे याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.घोट व परिसरातील रस्ते जड वाहतुकीमुळे खराब होऊन खड्डेमय झाले आहेत. एखादे वाहन वेगात पळवतो म्हटले तर आदळून-आपटून जीवघेणा प्रवास करावा लागतो आहे. अश्यातच काल सोमवारी सायंकाळच्या सुमारास ट्रॅक्टर चालक रितीक वैरागडे व बाजूला बसलेला नीलेश सुरजागडे हे दोघेही ट्रॅक्टर क्रमांक-एमएच ३३ एफ ४११३ ने दर्पणगुडा गावावरून घोटकडे जात होते.जात असतांनाच वेगात असलेल्या ट्रॅक्टरवरून चालकाच्या बाजूला बसलेल्या नीलेशचा तोल गेला.तोल जाताच तो खाली पडला.खाली पडताच ट्रॅक्टरचे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने तो जागीच ठार झाला.घटना घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मोठी गर्दी केली.घोट पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल केला.घटनेनंतर नातेवाईकांना माहिती देताच त्यांनी रुग्णालयात धाव घेत नीलेशचा मृतदेह पाहून एकच हंबरडा फोडला.मयत नीलेशचे वडील दीपक सुरजागडे यांच्या तोंडी फिर्यादीवरून घोट पोलीस मदत केंद्रात गुन्हाची नोंद करण्यात आली.
- Advertisement -

