Sunday, September 6, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआज पहाटेची भयावह घटना.! अनियंत्रित कार पुलाला धडकून पेटली.. - ६ पैकी...

आज पहाटेची भयावह घटना.! अनियंत्रित कार पुलाला धडकून पेटली.. – ६ पैकी ५ जण जिवंत जळाले तर एका महिलेचे दोन्ही पाय तुटले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर जिल्ह्यात आज,बुधवार १८ जून रोजी पहाटेच्या सुमारास मोठा अपघत घडल्याची घटना उघडकीस आली आहे. अपघातात दोन कुटुंबीयांचा स्विफ्ट कार मध्येच होरपळून मृत्यू झाला,तर एका महिलेचे दोन्ही पाय तुटून ती थोडक्यात बचावली.भरधाव वेगाने जाणारी स्विफ्ट कार अनियंत्रित होऊन पुलाला धडकली आणि रस्त्याच्या कडेला ५ फूट खाली कोसळली.खाली कोसळतच कारने पेट घेतला आणि मोठी आग लागली.मृतांमध्ये पती,पत्नी आणि त्यांचा मुलगा यांचा समावेश आहे.तर अपघातात पत्नीचा भाऊ आणि त्याची पत्नी यांचाही मृत्यू झाला.
कारमध्ये बसलेल्या ६ पैकी ५ जण जिवंत जळून खाक झाले.२६ वर्षीय तन्वीज,त्याची २३ वर्षीय पत्नी निदा, तन्वीजची २४ वर्षीय बहीण मोमिना,३० वर्षीय मेहुणा जुबैर आणि मोमिनाचा २ वर्षाचा मुलगा जैनुल या पाच जणांचा अपघातात मृत्यू झाला.तर कार पुलाला धडकल्याने तन्वीजची बहीण गुलनाज उर्फ भुरो ही कारमधून खाली पडल्याने तिचे दोन्ही पाय तुटले.तिला जवळच्या गुलनाजला झांगीराबाद सीएचसीमध्ये दाखल करण्यात आले आहे.हे कुटूंबीय बुलंदशहर जिल्ह्याच्या बदायूंमधील चमनपुरा (सहस्वान पोलिस स्टेशन)येथील रहिवासी होते.सर्वजण आज पहाटे साडे तीन वाजता स्विफ्ट कार क्रमांक-डीएल ३ सीबीडी ७५६७ ने बदायु मध्ये एका विवाह सोहळ्यात उपस्थिती दर्शवून दिल्लीच्या मालवीय नगर या ठिकाणी जात होते.वाटेतच काळाने झडप घातली आणि सर्वकाही हिरावून घेतले.घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!