Friday, September 4, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातील बाराही तालुक्यात १२६ संतृप्ती शिबिरांचे आयोजन..

गडचिरोली जिल्ह्यातील बाराही तालुक्यात १२६ संतृप्ती शिबिरांचे आयोजन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-आदिवासी समाजाच्या आर्थिक व सामाजिक सशक्तीकरणासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान (PM JANMAN) आणि प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान (DA-JUGA)अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात १५ जून ते ३० जून २०२५ या कालावधीत विशेष संतृप्ती शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २ ऑक्टोंबर २०२४ रोजी सुरू करण्यात आलेल्या धरती आबा मोहिमेअंतर्गत १७ मंत्रालये आणि विभागांच्या माध्यमातून २५ उपक्रम राबविले जात असून आदिवासी भागांमध्ये सेवा आणि पायाभूत सुविधा संतृप्त करणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
या अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील सर्व बाराही तालुक्यांमध्ये एकूण १२६ संतृप्ती शिबिरांचे सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.यात सिरोंचा येथे ४,मुलचेरा ५,अहेरी १८,एटापल्ली १३,भामरागड १३, धानोरा ७,आरमोरी ४,गडचिरोली ३, देसाईगंज २८, कुरखेडा ४, कोरची ९ आणि चामोर्शी येथे १८ शिबिरांचा समावेश आहे.
या शिबिरांमध्ये अनुसूचित जमातीच्या नागरिकांना विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे. त्यामध्ये नवीन आधार कार्ड व दुरुस्ती,मतदार ओळखपत्र नोंदणी व दुरुस्ती,अनुसूचित जमाती प्रमाणपत्र,मनरेगा अंतर्गत जॉबकार्ड,रेशनकार्ड नोंदणी, बँक खाते उघडणे, वैयक्तिक वनहक्क दावे, आयुष्यमान भारत कार्ड,किसान क्रेडीट कार्ड व पीएम किसान कार्ड,प्रधानमंत्री आवास योजना अर्ज,वनधन विकास केंद्राचा लाभ,सौरऊर्जा व गॅस कनेक्शन, विविध विमा योजना तसेच आरोग्य विभागामार्फत सिकलसेल व अ‍ॅनेमिया तपासणी अशा सेवांचा समावेश आहे.नागरिकांनी आवश्यक मूळ कागदपत्रांसह या शिबिरांमध्ये उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा आणि या सशक्तीकरण मोहिमेत सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या नागरिकांना केले आहे.तसेच अधीक माहितीकरिता एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी रणजित यादव (गडचिरोली),कुशल जैन (अहेरी) व नमन गोयल (भामरागड) यांच्या कार्यालयात संपर्क साधावा.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!