Friday, August 7, 2026
Homeनवी दिल्लीअखेर जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जारी.. - दोन टप्प्यात केली जाणार जातनिहाय जनगणना..

अखेर जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जारी.. – दोन टप्प्यात केली जाणार जातनिहाय जनगणना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नवी दिल्ली :-केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. बुधवार ३० एप्रिल २०२५ ला केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली होती.पार पडलेल्या बैठकीत केंद्र सरकारने देशभरात  जातनिहाय  जनगणना करण्याचा निर्णय घेतल्याचे केंद्रीय रेल्वे तथा देशाचे माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सर्वंकष जाहीर केले होते.त्यानुसार आता गृह मंत्रालयाने आज,सोमवार १६ जून रोजी जातनिहाय जनगणनेसाठी अधिसूचना जारी केली आहे.केंद्र सरकार दोन टप्प्यात जातनिहाय जनगणना करणार आहे.अधिसूचनेनुसार,पहिला टप्पा १ ऑक्टोंबर २०२६ पासून सुरू होईल.त्यात हिमाचल प्रदेश, उत्तराखंड,जम्मू आणि काश्मीर आणि लडाख ही चार राज्ये समाविष्ट आहेत.तर दुसरा टप्पा १ मार्च २०२७ पासून सुरू होईल.यामध्ये देशातील उर्वरित राज्यांमध्ये जनगणना सुरू होईल.तत्पूर्वी काल रविवारी गृहमंत्री अमित शहा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत १६ व्या जातनिहाय जनगणनेच्या तयारीचा आढावा घेतला.दर १० वर्षांनी जातनिहाय जनगणना केली जाते.२०११ मध्ये देशातील शेवटची जात जनगणना झाली होती. पुढील जनगणना २०२१ मध्ये होणार होती,पण कोविड-१९ महामारीमुळे ती पुढे ढकलण्यात आली व आता २०२६ ते २०२७ मध्ये जातनिहाय जनगणना केली जाणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

गडचिरोली जिल्ह्यात अग्निवीर भरतीसाठी तब्बल सहा ठिकाणी मार्गदर्शन मेळावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारतीय सैन्यातील अग्निवीर भरती प्रक्रियेबाबत जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींना सविस्तर माहिती व मार्गदर्शन मिळावे,यासाठी गडचिरोली जिल्ह्यात येत्या,सोमवार १० ते १२ ऑगस्ट २०२६...

सात हजाराची लाच भोवली; महिला ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत तब्बल सात हजाराची लाच घेतांना एका महिला ग्रामसेविकेस रंगेहाथ पकडले.रंजू...

राज्यातील ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांना ५ हजार २९ कोटींच्या कर्जमुक्ती लाभाचे वितरण.. – आज गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांसाठी बँकांना रक्कम...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांसाठी १५ कोटी १८ लाख ७२ हजार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!