Friday, June 19, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअखेर लिखित आश्वासनानंतर आज बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित.. - शेतकरी कर्जमाफीसह विविध...

अखेर लिखित आश्वासनानंतर आज बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित.. – शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी सुरू होते आंदोलन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफी,दिव्यांगांना निधी यासह १७ मागण्यांसाठी ८ जून २०२५ पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते.अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यातील मोझरीमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू होते.विरोधी पक्षातील नेत्यांसह विविध संघटनांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला होता.त्यानुसार सदरच्या आंदोलनाची महायुती सरकारने दखल घेत बच्चू कडू यांना लेखी आश्वासन दिल्याने तब्बल सातव्या दिवशी म्हणजेच आज,शनिवार १४ जून रोजी अन्नत्याग आंदोलन आणि चक्का जाम आंदोलन स्थगित करीत असल्याची घोषणा केली आहे.त्यांनी म्हटले की, सरकारतर्फे लेखी आश्वासनानंतर अन्नत्याग आंदोलन स्थगित केले आहे,याची सर्वांनी नोंद घ्यावी.तसेच उद्या,रविवार १५ जून होणारे चक्काजाम हे देखील स्थगित करण्यात आले आहे,असे बच्चू कडू यांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत सांगितले आहे.तत्पूर्वी
काल शुक्रवारी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंदोलन स्थळी जाऊन बच्चू कडू यांची भेट घेतली होती.या भेटीवेळी त्यांनी बच्चू कडू यांच्याशी चर्चा केली.त्यानंतर सरकारच्या वतीने बच्चू कडू यांना लेखी आश्वासन दिले.
शेतकरी कर्ज माफीसाठी १५ दिवसांमधे उच्चस्तरीय समिती नेमली जाईल.समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर कर्ज माफी संदर्भात निर्णय घेण्यात येईल तथा थकीत कर्जदाराच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती देणे व नवीन कर्ज वाटप करण्यासाठी बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल.दिव्यांगाच्या मानधन वाढी बाबत ३० जून च्या पुरवणी बजेट मध्ये तरतूद करण्यात येईल.उर्वरित मुद्यावर संबंधित मंत्री तथा मुख्यमंत्री महोदय यांचे सोबत बैठक घेऊन मागण्या निकाली काढल्या जातील. सरकारकडून प्रमुख मागण्यांसदर्भात लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर बच्चू कडू यांनी चक्का जाम आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गडचिरोली हे भविष्यात देशातील महत्त्वाचे औद्योगिक व पोलाद उत्पादन केंद्र म्हणून...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात,अशी...

माजी सैनिकास पैश्याची मागणी; महिला लिपिक एसीबीच्या कचाट्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-एका ३६ वर्षीय महिला लिपिकेस(महसुल सहाय्यक)माजी सैनिक यांचे ताब्यात असलेली सिलींगची अतिक्रमीत जमीन माजी सैनिक म्हणुन त्यांचे नावावर नियमीत करुन देण्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!