- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-रब्बी हंगाम २०२४-२५ अंतर्गत शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेनुसार उद्या,शनिवार १४ जून पासून जिल्ह्यातील एकूण ३९ खरेदी केंद्रांवर रब्बी धानाची खरेदी सुरू करण्यात आली आहे.या खरेदी केंद्रांवर शासनाने निश्चित केलेल्या २ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल दराने धानाची खरेदी करण्यात येत असून त्यासाठी कुरखेडा तालुक्यातील-१७ खरेदी केंद्र, कोरची तालुका- ४ खरेदी केंद्र,आरमोरी तालुका- ३ खरेदी केंद्र,देसाईगंज(वडसा)तालुका-१ खरेदी केंद्र, गडचिरोली तालुका-३ खरेदी केंद्र,धानोरा तालुका- २ खरेदी केंद्र तसेच सिरोंचा तालुक्यातील- ९ खरेदी केंद्रे निश्चित करण्यात आले आहेत.
सदर खरेदी केंद्रांचे संचालन आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था आणि महामंडळाच्या माध्यमातून केले जात आहे.शासनाच्या आधारभूत किंमत योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या जवळच्या अधिकृत खरेदी केंद्रावर विहित नियम व अटींचे पालन करून धान विक्री करावी आणि अधिकृत पावती घ्यावी,असे आवाहन प्रादेशिक व्यवस्थापक,गडचिरोली यांनी केले आहे.
- Advertisement -

