Thursday, September 3, 2026
Homeकोंढाळा१ लाख रुपये घेऊन अवैध रेतीचे ट्रॅक्टर सोडणारे 'ते' अधिकारी,कर्मचारी कोण?- कोंढाळा-पिंपळगाव...

१ लाख रुपये घेऊन अवैध रेतीचे ट्रॅक्टर सोडणारे ‘ते’ अधिकारी,कर्मचारी कोण?- कोंढाळा-पिंपळगाव वैनगंगा नदी घाटावरील प्रकार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कोंढाळा :- देसाईगंज तालुका मुख्यालयापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या कोंढाळा गावातील पळसगाव वैनगंगा नदी घाटावर २३ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्रो जवळपास १२.३० वाजता च्या सुमारास एक अनोखा प्रकार घडला असून,अवैधरीत्या रेतीची विना वाहतूक करतांना दोन ट्रॅक्टर पकडून,पकडलेल्या ट्रॅक्टर धारकांकडून अंधाराचा फायदा घेत १ लाख रुपये घेऊन अवैध रेतीचे ट्रॅक्टर सोडणारे ‘ते’ अधिकारी व कर्मचारी कोण? अशी खमंग चर्चा सर्वत्र गावामध्ये सुरू असल्याने अवैध वसुली करणारे चर्चेचा विषय ठरू लागले आहेत.

कोंढाळा-पळसगाव वैनगंगा नदी घाटावरून बऱ्याच दिवसांपासून अवैधरीत्या रेतीची विना वाहतूक परवाना तस्करी केली जात आहे.अशातच २३ फेब्रुवारी रोजी रात्रो जवळपास १२.१५ ते १२.३० वाजेच्या दरम्यान एक ट्रॅक्टर रेती घाटातून निघत असल्याची माहिती एका विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना  गुपितरित्या मिळाली असता; त्यांनी घटना स्थळ गाठून रेती तस्कराचा पाठलाग करून त्यास पकडले.एका रेती तस्करास पकडल्याने त्याने नदी रेती घाटात असलेल्या दुसऱ्या रेती तस्कराचे नाव सांगितल्याने ‘सोने पे सुहागा’ असे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे झाले.जिथे एकाचे लाल व्हावे तिथे दोघांचे लाल आणि पाणी झाले.असे दोन्ही मिळून मालपाणी झाल्याने दाम दुप्पट झाले.

मग ठरले ५० हजार रुपये अधिक ५० हजार रुपये, यामध्ये समजोता करून दोन्ही ट्रॅक्टर धारकांना सोडून ‘तेरी भी चूप,मेरी भी चूप’ असा खेळ रंगून तालीम शांत झाली.मात्र सदर घटनेची चर्चा सर्वत्र गुंजु लागल्याने सर्वांचे पितळ उघडे पडले आहे.काही जणांची ऑडियो क्लिपही बाहेर येण्याची शक्यता बळावली असल्याने ‘ते’ अधिकारी,कर्मचारी कोण? हे लवकरच कळणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!