Sunday, September 13, 2026
Homeगडचिरोलीउद्याला शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन..

उद्याला शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना मार्गदर्शन,माहिती आणि सक्षमीकरणाच्या उद्देशाने आत्मा प्रकल्पातर्फे विशेष कार्यशाळेचे आयोजन उद्या,गुरुवार १२ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे करण्यात आले असून सदरची कार्यशाळा सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि विविध विषयांवरील सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यशाळेत शेतकरी,कृषी उद्योजक तसेच उत्पादन कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी होणार असून कृषी,महसूल,उद्योग,वन,खते व जैविक उत्पादन यासारख्या विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचे सखोल मार्गदर्शन लाभणार आहे.होणाऱ्या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी आत्माच्या संचालक प्रीती हिरळकर, अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे,जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश गायकवाड आणि जिल्हा सहकारी बँकेचे व्यवस्थापक प्रशांत धोंगळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
कार्यशाळेत भाडेपट्टी करार,वनजमिनीवरील उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या परवानग्या,कृषक जमिनीवर प्रक्रिया उद्योग उभारतांना आवश्यक कागदपत्रे,प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत उत्पादनवाढ व कृषी अवजारे बँक यावरील माहिती,उत्पादन कंपन्यांना आवश्यक परवाने,कंपनी स्थापनेपासून मूल्यसाखळी तयार करण्याच्या संधी,भाजीपाला लागवड व त्याचे शाश्वत व्यवस्थापन,नैसर्गिक शेती,पॅकेजिंग,जैविक निविष्ठा, सेंद्रिय मानांकन,बीआरसी उभारणी या विषयांवर तज्ञांद्वारे सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.
शेतकरी आणि उत्पादक कंपन्यांना उद्योजकीय क्षेत्रात उभे राहण्यासाठी ही कार्यशाळा दिशादर्शक ठरणार असून शेतकऱ्यांनी या कार्यशाळेत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आत्माच्या संचालक प्रीती हिरळकर यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘जत्रा घडली नागोबाची’ या लोकनाट्यास सातारा येथील पुरस्कार जाहीर.. -यंदाचा सहावा पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट,डाकेवाडी(जि. सातारा)या संस्थेतर्फे दरवर्षी मराठी साहित्यिकांसाठी उत्कृष्ट वाड्.मय स्पर्धा घेण्यात येते व पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना स्पंदनच्या वार्षिक साहित्य संमेलनात उत्कृष्ट...

शाळेत विद्यार्थ्यांना दिली जाणारी शारीरिक शिक्षा पॉक्सो कायद्यांतर्गत लैंगिक गुन्ह्याच्या श्रेणीत येत नाही-सर्वोच्च न्यायालय -शिक्षकावरील संपूर्ण खटला रद्द..

उद्रेक न्युज वृत्त :-शाळेत शिक्षकाने दोन विद्यार्थिनींना दिलेल्या शिक्षेवरून शिक्षकाविरोधात नोंदवण्यात आलेला गुन्हेगारी खटला सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपणे रद्द करून शाळेत विद्यार्थ्यांना दिली जाणारी शारीरिक...

आपसी समझोत्याने ४६१ प्रकरणे निकाली; तब्बल ४ कोटी १६ लाखांहून अधिकच्या रकमेवर तडजोड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्हा न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये शनिवार १२...

कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील यादी गावपातळीवर प्रसिद्ध.. – गडचिरोली जिल्ह्यातील आतापर्यंत ४ हजार ३७१ शेतकऱ्यांच्या खात्यात २५ कोटी रुपये जमा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’च्या दुसऱ्या टप्प्यात गडचिरोली जिल्ह्यातील ३ हजार ६१० शेतकरी पात्र ठरले आहेत.पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!