Sunday, July 26, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली येथे शासकीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार-मंत्री नितेश राणे

गडचिरोली येथे शासकीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार-मंत्री नितेश राणे

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात मत्स्यव्यवसाय उत्पादन वाढवण्यासाठी व राज्यात हा जिल्हा अग्रेसर करण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील,असे आश्वासन मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.आज बुधवारी ते गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी मत्स्य उत्पादन वाढविण्यासाठी तलावांमधील गाळ काढणे आणि तलाव परिसरातील अतिक्रमणे हटवण्यावर भर दिला.
या बैठकीला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा,आमदार धर्मरावबाबा आत्राम,आ.डॉ.मिलिंद नरोटे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, मत्स्य व्यवसाय उपायुक्त सुनील जांभुळे,अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे,निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.मंत्री राणे यांनी गडचिरोली जिल्ह्यात मत्स्य उत्पादनात मागे असण्याची कारणे जाणून घेतली आणि त्यात वाढ कशी करता येईल यावर विचारणा केली.त्यांनी मत्स्यव्यवसायिक आणि तलावांतील ठेकेदारांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेण्याच्या सूचना मत्स्यव्यवसाय आणि पाटबंधारे विभागाला दिल्या.मंत्री राणे यांनी जलसंधारण विभागाला तलावांमधील गाळ काढण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यास सांगितले. मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. यासोबतच,जिल्ह्यात मत्स्य वाढीच्या विविध योजना राबवण्यासाठी जिल्हा नियोजनमध्ये पाच टक्के निधी राखीव ठेवण्याबाबत चर्चा करण्यात आली.
पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायतींमध्ये आदिवासी समुदायासाठी असलेल्या योजनांचा लाभ केवळ त्यांच्यापर्यंतच पोहोचावा आणि इतर कोणीही त्याचा गैरफायदा घेऊ नये,याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.गडचिरोली येथे शासकीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल,असेही राणे यांनी सांगितले.तसेच,राज्यात मच्छीमारांसाठी आणि मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी नवीन योजना तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त समीर डोंगरे यांनी सादरीकरणाद्वारे गडचिरोली जिल्ह्याची माहिती दिली.यावेळी रमेश बारसागडे,पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल मोरघडे, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता अमित राऊत तसेच नागपूर विभागातील सर्व मत्स्यव्यवसाय उपायुक्त व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतातील सागवानाची ५०० झाडे जळून खाक; विद्युत वितरण कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका..

उद्रेक न्युज वृत्त :-यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक आपल्या न्याय हक्काचा लढा नेहमी लढतांना दिसून येतात.ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेत शेतकरी साहित्यातील त्रुटी असोत वा...

अखेर विद्यार्थी आंदोलनाचा मोठा विजय; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा.

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून राजधानीतील जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आज...

नशामुक्त युवा विकसित भारत’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन.. – विजेत्या स्पर्धकांना जिल्हास्तरीय पारितोषिकांसह राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या मेरा युवा भारत(MY Bharat) उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या "नशामुक्त युवा विकसित भारत" या राष्ट्रव्यापी अभियानाच्या...

‘डायल ११२’ वर खोटी माहिती देत असाल तर सावधान; कारावासासह दंडाची शिक्षा.. – खोटी माहिती दिल्याने तरुणावर गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :- 'डायल ११२' हा भारत सरकारचा आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक आहे.याद्वारे आपत्कालीन परिस्थितीत पोलिस व इतर काही महत्त्वाच्या सेवा एकाच नंबरवर जलद...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!