Thursday, September 3, 2026
Homeमुंबईलाडकी बहिण योजनेसाठी पात्र नसतांनाही घेतला लाभ; ३ कोटी ५८ लाख रुपये...

लाडकी बहिण योजनेसाठी पात्र नसतांनाही घेतला लाभ; ३ कोटी ५८ लाख रुपये सरकार करणार वसूल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-लाडकी बहिण योजनेला सुरुवात होताच,अनेक महिलांनी पैसे मिळतात म्हणून मोठ्या प्रमाणावर अर्ज सादर केलेत.मात्र,सरकारने शासन निर्णय काढून काही अटी,शर्ती लागू केल्या होत्या.अश्यातच अटी,शर्तीच्या नियमांना बगल देत काही महिलांनी चक्क शासनाची दिशाभूल केल्याचे आता उघड झाले आहे.त्यामुळे सरकार आता अश्या महिलांकडून रक्कम वसूल करणार आहे.यात २ हजार ६५२ महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेअंतर्गत फसवणूक करून लाभ घेतल्याचे उघड झाले आहे.
सामान्य प्रशासन विभागाने या शासकीय कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याच्या तक्रारींवरून १ लाख ६० हजार ५५९ कर्मचाऱ्यांचा यू आय डी (UID) डेटा माहिती आणि तंत्रज्ञान विभागाला प्रदान केला.या कर्मचाऱ्यांची सेवार्थ प्रणालीमध्ये नोंदणी करण्यात आली होती.त्यापैकी किती जणांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळाला हे शोधण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली.त्यात २ हजार ६५२ महिला कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात थेट निधी जमा झाल्याचे आढळून आले.ऑगस्ट २०२४ ते एप्रिल या कालावधीत या प्रत्येक महिलांना १३ हजार ५०० रुपये मिळाले,म्हणजेच एकूण ३ कोटी ५८ लाख रुपये बेकायदेशीरपणे मिळाले.सरकारी धोरणात स्पष्टपणे म्हटले आहे की,सरकारी कर्मचारी या योजनेसाठी पात्र नाहीत. तथापि,या कर्मचाऱ्यांनी माहिती असूनही अर्ज केला आणि त्यांना लाभ मिळाले.त्यापैकी बहुतेक वर्ग ३ आणि वर्ग ४ सेवा श्रेणीतील आहेत.अशाच प्रकारे अतिरिक्त सहा लाख कर्मचाऱ्यांची छाननी केली जाणार आहे.लाडकी बहिण योजनेचा बेकायदेशीरपणे लाभघेणाऱ्या २ हजार ६५२ महिला कर्मचाऱ्यांना मिळालेले ३ कोटी ५८ रुपये आता सरकार वसूल करणार आहे.सामान्य प्रशासन विभाग लवकरच सर्व सरकारी विभागांना या वसुलीसाठी आदेश जारी करणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!