Saturday, April 18, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअस्मानी संकटामुळे शेतकरी मेटाकुटीस; मुख्य रस्त्यांवर धान पसरवून सुकविण्याचा प्रयत्न..

अस्मानी संकटामुळे शेतकरी मेटाकुटीस; मुख्य रस्त्यांवर धान पसरवून सुकविण्याचा प्रयत्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात अवकाळीमुळे पिकांसोबतच घरांची पडझड झाली आहे.काही ठिकाणी वीज पडून जीवितहानी झाली आहे.तर,गारपिटीमुळे पिके भूईसपाट झाली आहेत.अस्मानी संकटामुळे शेतकरी मेटाकुटीस आला असतांनाही अवकाळी वादळी पाऊस अद्याप थांबण्याची चिन्हे नाहीत.कित्तेक ठिकाणी
शेतात कापून ठेवलेल्या आणि कापणीला आलेल्या धानात पावसाचे पाणी शिरल्यामुळे धानाला कोंब फुटले.काही शेतकऱ्यांनी धानाची मळणी केली असता पावसाने धान भिजून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.गावातील शेतकरी मुख्य रस्त्यांवर धान पसरवून सुकविण्याचा प्रयत्न करीत आहेत.सिंचन प्रकल्प आणि विहिरींतील पंपाच्या पाण्याच्या भरवशावर मोठ्या प्रमाणात यंदा रबी हंगामात धान पिकाची पेरणी करण्यात आली.कृषी विभागाने रबी हंगामातील पेरणीचा अंदाज बांधला, त्यापेक्षा जास्त क्षेत्रात रबीची पेरणी करण्यात आली.  लागवड करण्यात आलेली धानपीक कापणीला वेग आले आहे.तर काही ठिकाणी पंधरवाड्यात धान कापणीला येणार आहे.परंतु,विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस कोसळत असल्याने पिकांना धोका निर्माण झाला आहे.पण अवकाळीमुळे शेतकरी धान कापण्यास विलंब करीत आहेत.काही भागात उभे असलेले धानपीक वादळामुळे खाली लोळायला लागली आहेत.त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होऊन डोक्यावर हात मारत आहे.शेतकऱ्यांच्या नशिबी केवळ संकटे ओढवली जात आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

मोहफुले वेचत असतांनाच बिबट्याचा हल्ला.. – जंगलशिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीटातील एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!