Thursday, August 27, 2026
Homeब्रम्हपुरीरेती तस्करांनी तलाठ्यांवर चढवला हल्ला....- ब्रम्हपुरी तालुक्यातील घटना...

रेती तस्करांनी तलाठ्यांवर चढवला हल्ला….- ब्रम्हपुरी तालुक्यातील घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

ब्रह्मपुरी :- तालुक्यातील तपाळ रेती घाटावरून अवैध रेतीतस्करी होत असल्याचे तहसीलदार उषा चौधरी यांना माहिती पडताच त्यांनी लेखी आदेश काढून सदर होत असलेल्या अवैध रेतीतस्करी करणाऱ्यांवर कावाईचे आदेश तलाठ्यांना दिले.तलाठी राजेश आकोजवार व हिमांशू पाजनकर हे दोन्ही तलाठी कहाली गावा जवळील सकाळच्या सुमारास एका ट्रॅक्टरला थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने ट्रॅक्टर न थांबवता,शेतात नेऊन उभा केला.दोन्ही तलाठी वाहनाजवळ गेले असता ट्रॅक्टरचे  नंबर प्लेट नव्हते.त्यामधे अंदाजे जवळपास एक ब्रास रेती भरलेली असल्याचे तलाठ्यांना आढळून आले. 

ट्रॅक्टर मध्ये असलेल्या रेती बाबत ट्रॅक्टर चालकाला विचारले असता त्याने माहिती देण्यास टाळटाळ केली.तसेच त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे सांगितले.सदर ट्रॅक्टर तहसील कार्यालयात लावण्यासाठी तलाठ्यांनी सांगितले असता चालकाने सदर ट्रॅक्टर प्रिन्स श्रीनाथ सिंग याचा असल्याचे सांगितले.दरम्यान प्रिंन्स श्रीनाथ सिंग दोन इसमासह घटनास्थळी येऊन दोघांवर हल्ला चढवून मारहाण केली असल्याचे तलाठ्यांनी कथन केले.कॉलर पकडून जिवे मारण्याची धमकी व ट्रॅक्टर अडविण्यासाठी प्रयत्न केला तर प्रिंन्स श्रीनाथ सिंग व त्याचे सहकारी आम्हाला मारण्यासाठी धावले असल्याचे तलाठ्यांनी म्हटले आहे.प्रसंगावधान बघून तलाठ्यांनी स्वः रक्षणासाठी घटनास्थळावरू पलायन केले.

सदर घटनेची माहिती मंडळ अधिकारी अ-हेरनवरगाव व तहसीलदार यांना देऊन पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली.सदर तक्रारीवरून रेती तस्कर प्रिंन्स श्रीनाथ सिंग व इत सहकारी यांच्या विरोधात भादंवि १८६० अधिनियचे कलम ३५३,३७९,३२३,५०४, ५०६ व कलम३४ अन्वये गुन्ह दाखल करण्यात आला आहे. आरोपींन अटक करण्यात आली असून सदर घटनेचा पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस प्रशासन करीत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ट्रेनिंग संपली; आता महाराष्ट्राला मिळाले १२ नवे ‘आयपीएस’ अधिकारी.. – पहा कोणाला कुठे मिळाली पदस्थापना..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-नुकतेच हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत प्रशिक्षण घेतलेल्या तब्बल १२ आयपीएस(भारतीय पोलीस सेवा) अधिकाऱ्यांना राज्यातील वेगवेगळ्या भागात जबाबदारी...

पैगंबरांच्या जिवनाचा आदर्श घ्या-इमाम फैजल अजहरी – कुरखेडा येथे समाज प्रबोधन मेळावा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ईद मिलादून्नबी(मोहम्मद पैगंबर जयंती)च्या पूर्वसंध्येला मौलाना आझाद चौक कुरखेडा येथे समाज प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नागपूर येथील...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!