Tuesday, July 28, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआज पहाटेच्या घटनेत; पुलावरून कार कोसळून पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू..

आज पहाटेच्या घटनेत; पुलावरून कार कोसळून पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-अंत्यविधीसाठी कारने निघालेल्या दोन कुटुंबियांवर काळाने झडप घातली असल्याची घटना आज,सोमवार १९ मे रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली.घटनेत कारचालक गंभीर जखमी झाला.तर,पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.मेधा परमेश पराडकर वय ४० वर्षे,सौरभ परमेश पराडकर वय २२ वर्षे,मिताली विवेक मोरे वय ४५ वर्षे,निहार विवेक मोरे वय १९ वर्षे,श्रेयस राजेंद्र सावंत वय २३ वर्षे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.तर परमेश पराडकर आणि विवेक मोरे हे गंभीरित्या जखमी झाले.दोन्ही कुटूंबीय मुंबई येथे वास्तव्यास असून पराडकर कुटुंबीय नालासोपारा परिसरात राहणारे आहेत,तर मोरे कुटूंबीय मिरा-भाईंदर येथील आहेत.
दोन्ही कुटूंबीय मुंबई मिरारोड येथून किया कार क्रमांक-एम एच ०२३२६५ ने रत्नागिरीच्या देवरुख येथे अंत्यविधीसाठी जात होते.अश्यातच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रत्नागिरीच्या खेड येथील
भरणे नाका येथे आल्यावर जगबुडी नदीवरील मोठ्या पुलावरून कार थेट नदीत कोसळली.घटनेची माहिती होताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली.कारमधून जखमींना तातडीने बाहेर काढून कळंबणी येथील रुग्णालयात तातडीने हलवण्यात आले.त्यानंतर क्रेनच्या मदतीने कार बाहेर काढण्यात आली.मात्र,झालेल्या अपघातात पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.या अपघातात गंभीर जखमी झालेले परमेश पराडकर यांना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय हलवण्यात आले.तर विवेक मोरे यांनाही खेड येथून पुढील उपचार करता हलवीण्यात आले आहे.घटनेचा पुढील तपास रत्नागिरीच्या खेड पोलिसांकडून सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!