Saturday, September 5, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंजच्या विहीरगावात जंगली हत्तींचा हैदोस; शेतातील धान तुडवले पायदळी..

देसाईगंजच्या विहीरगावात जंगली हत्तींचा हैदोस; शेतातील धान तुडवले पायदळी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-ऐन धान कापणीच्या हंगामाला सुरुवात झाली असतांनाच जंगली हत्तींनी देसाईगंज तालुक्यात एंट्री केल्याने शेतकरी बांधव धास्तावले आहेत.अश्यातच जंगली हत्तींनी काल,शनिवार रात्रीच्या सुमारास विहीरगाव परिसरात हैदोस माजवून शेतकऱ्यांचे धानपीक व कृषी साहित्य पायदळी तुडवून मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त होऊन आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.जंगली हत्तींनी देसाईगंज तालुक्याच्या विहीरगाव,डोंगरगाव व पिंपळगाव परिसरात आपला मोर्चा वळविला आहे.त्यातच काल शनिवारी रात्रीच्या सुमारास जंगली हत्तींनी विहीरगाव येथील शेतकरी सिद्धार्थ सहारे व मधुकर निहाटे यांच्या शेतातील धानपीक पायदळी तुडवून विजेचे खांब,कृषी पंपाचे पाईप व इतर साहित्यांची तोडफोड केल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.वन विभागाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून जंगली हत्तींचा बंदोबस्त करावा व नुकसानभरपाई देण्यात यावी; अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

‘या’ उमेदवारांना मिळणार मुलाखतीची तयारी करण्यासाठी १० हजाराचे आर्थिक सहाय्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची तयारी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!