- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-दहावी बोर्डाच्या परीक्षेच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली असतांनाच शिक्षण मंडळाने दहावी परीक्षेच्या निकालाच्या तारखेची अधिकृत घोषणा केली आहे.त्यानुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे,नागपूर,छत्रपती संभाजीनगर,मुंबई, कोल्हापूर, अमरावती,नाशिक,लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता १० वी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर उद्या, मंगळवार १३ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.
बारावीच्या निकालानंतर दहा दिवसांनी दहावीचा निकाल जाहीर केला जाईल,असे सांगण्यात आले होते.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निकालाबाबत उत्सुकता होती.अकरावीची प्रवेश प्रक्रिया येत्या १९ मे पासून सुरू होणार आहे.शालेय शिक्षण विभागाने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी अकरावीच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे.सर्व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रीय ऑनलाइन प्रणालीद्वारे प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. पोर्टलवर शाळांसाठी आवश्यक असलेली माहिती भरण्याची प्रक्रिया कालपासून म्हणजेच गुरुवार ८ मेपासून सुरू झाली आहे.तर विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज आणि प्रोफाइल तयार करण्याची सुविधा येत्या १९ मे पासून सुरू होईल. अश्यातच माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र म्हणजेच १० वी च्या फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. तसेच https://mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल व इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल,असे मंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
- Advertisement -

