Tuesday, June 23, 2026
Homeगुवाहाटीसात बाऱ्यावर वारसानचे नाव चढवायचे असेल तर एक रुपयाही लागत नाही.. -...

सात बाऱ्यावर वारसानचे नाव चढवायचे असेल तर एक रुपयाही लागत नाही.. – ८०० रुपयांसाठी सापडली महिला तलाठी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-शेतीच्या सातबाऱ्यावर नाव असलेला  घरचा एखादा व्यक्ती मृत पावल्यास वारसानचे म्हणजेच मुलगा,मुलगी,पत्नी वा इतरांचे नाव चढवायचे असेल,तर त्यासाठी एक रुपयाही लागत नाही.याविषयी अनेकांना याची माहिती नसल्याने तलाठी,मंडळ अधिकारी वा इतर चेलेचपाटे लवकर काम करून देतो,असे सांगून १ हजार,२ हजार वा इतर रकमेची मागणी करून गोर-गरिबांना लुटण्याचे काम करीत आहेत.वारसानचे नाव चढवायसाठी भरपूर पैसे लागतात,अशी शेतकऱ्यांची मनधारणा झाली असल्याने अनेकांनी कुटुंबातील वारसानची नावे सात बाऱ्यावर अनेक महिन्यांपासून वा वर्षांपासून चढविलेली नाहीत.कारण की,आम्हाला याची माहितीच नसल्याने असे होते आहे.याकरिता वारसान नोंदीची प्रक्रिया कागदपत्रे गोळा करणे व संबंधित साज्यातील तलाठ्यास नेऊन देणे असून त्याकरिता कुठलीही फी वा पैसे लागत नाही.वारसान फेरफार नोंदी करीता फेरफार अर्ज,पाच रुपयाची तिकीट,जी व्यक्ती मयत झाली अशाचा मृत्यू दाखला,अर्ज दाराची एक फोटो,चालू सात बारा,वारसान प्रमाणपत्र ग्रामपंचायत सरपंच व पोलीस पाटील यांचा,नावे चढविणाऱ्यांचे आधार कार्ड,१०० रुपयाचे स्टॅम्प पेपर इत्यादी कागदपत्रे गोळा करून गावातील तलाठ्यास सादर करावित.वारसान फेरफार नोंदी करीता कुणालाही पैसे देण्याची गरज नाही.अशातच वारस फेरफार नोंद घेण्यासाठी पैश्याची मागणी करणे एका महिला तलाठीस महागात पडले आहे.गोंदिया जिल्ह्याच्या सडक-अर्जुनी तालुक्यातील चिखली येथील तलाठी साजा क्रमांक-१७ येथे कार्यरत अश्विनी ठोंबरे हिने खासगी इसम ओंकार शेंडे रा.कोहळीटोला याच्या मार्फतीने ८०० रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकली आहे.तक्रारदाराच्या आईचा मृत्यू झाल्याने सातबारा उतारावरून नाव कमी करून वारस फेरफार नोंद घ्यायची होती.यासाठी त्यांनी संपूर्ण कागदपत्रे गोळा करून तलाठीकडे सादर केलीत.मात्र,
वारस फेरफार नोंद घेण्यासाठी १ हजार रुपये लागतील,असे तक्रारदारास सांगण्यात आले व तडजोडीअंती ८०० रुपये देण्याचे ठरले.तक्रारदाराला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याची तक्रार त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी केली असता तलाठी ठोंबरे यांनी लाच स्वीकारण्याची इच्छा दर्शविली.त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल गुरुवारी दुपारच्या सुमारास सापळा रचला व तक्रारदार लाच रक्कम देण्यासाठी तलाठी कार्यालयात गेला असता, तलाठी ठोंबरे यांनी रक्कम कार्यालयात काम करणाऱ्या खासगी इसम ओंकार शेंडे यांच्या मार्फत स्वीकारली असता पथकाने दोघांनाही रंगेहात पकडले.त्यामुळे वारस फेरफार करण्यासाठी कुणीही पैसे मागत असेल तर त्याची तक्रार डायरेक्ट लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे करा.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

गॅस सिलेंडर घ्यायचा की मुलांच्या शाळेची फी भरायची?

उद्रेक न्युज वृत्त :-सिलिंडरच्या वाढत्या किमतींमुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांनी गॅस वापरणे बंद करून पुन्हा एकदा पारंपरिक चुलीकडे वळण्यास सुरुवात केली आहे.सिलेंडर घ्यायचा की...

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक-१७ जागांचा निकाल जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील १७ विधान परिषदेच्या जागांपैकी ६ जागांवर महायुतीने आधीच बिनविरोध विजय मिळवला.अश्यातच आज,सोमवार २२ जून रोजी ११ स्थानिक स्वराज्य संस्था...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!