Wednesday, April 15, 2026
Homeगुवाहाटीमुले सासरी जातांना कधी बघितले काय?- तर पहा येथे मुले जातात सासरी....

मुले सासरी जातांना कधी बघितले काय?- तर पहा येथे मुले जातात सासरी….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गुवाहाटी :- भारतात मुलींपेक्षा मुलांना जास्त महत्त्व मिळत असल्याचे दिसते. मुलींना परक्याचे धन मानले जाते; परंतु भारतातील मेघालय, आसाम व बांगला देशातील काही भागात राहणाऱ्या खासी समुदायात वेगळी परंपरा पाहायला मिळते. या समुदायामध्ये मुलांना नाही तर मुलींना अधिक महत्त्व दिले जाते. येथे मुली नाही तर मुले मुलीसोबत सासरी जातात. मुलगी झाल्यानंतर आनंदोत्सव साजरा केला जातो, पण मुलगा झाल्यानंतर काही खास आयोजन केले जात नाही. या समुदायात मातांना आणि मुलींना देवाचा दर्जा दिला जातो. 

पूर्णपणे मुलींसाठी ही जमात समर्पित मानली जाते. मुलीच्या जन्मानंतर काही लोक दुःख व्यक्त करतात, त्यांनी या समुदायाकडून शिकण्यासारखे आहे. आजदेखील भारतात बहुतांशी समाजातील लोक मुलीचा जन्म म्हणजे ओझं मानतात, लोकांची मानसिकता बदलत आहे. मुलींच्या जन्माचे देखील स्वागत केले जात आहे. खासी जमातीमध्ये मुले मुलीसोबत सासरी राहायला जातात. म्हणजे मुली आयुष्यभर आई- वडिलांसमवेतच राहतात. मुले आपले घर सोडून घरजावई म्हणून जातात आणि याला अपमान समजला जात नाही. वडिलोपार्जित संपत्ती मुलाला नाही तर मुलींना मिळते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

फरार आरोपींवर ‘लुकआउट सर्क्युलर’ नंतर मालमत्ता जप्तीची प्रक्रिया सुरू.. – स्फोटके बनवणाऱ्या कंपनीतील स्फोट प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील स्फोटके बनवणाऱ्या एसबीएल कंपनीत १ मार्च २०२६ रोजी भीषण स्फोट झाला होता.एसबीएल कंपनीच्या आवारात झालेल्या भीषण स्फोटात आतापर्यंत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!