Saturday, September 12, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तजिल्हा परिषद शाळेच्या पहिल्या वर्गातील विद्यार्थिनीचा उष्माघाताने मृत्यू...

जिल्हा परिषद शाळेच्या पहिल्या वर्गातील विद्यार्थिनीचा उष्माघाताने मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात बऱ्याच दिवसांपासून उष्णतेत लक्षणीय वाढ झाली आहे.सूर्यदेवता जणूकाही मनुष्य प्राणीमात्रांवर कोपला की काय? असे हल्ली सर्वत्र दिसून येत आहे.एप्रिल महिन्यामध्येच एकदम कडक उन्ह तापू लागल्याने जीव कासावीस होऊ लागला आहे.सर्वत्र उन्हाच्या तीव्र झळा जाणवत असल्याने प्रशासनाच्या वतीने उष्माघात टाळण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.अशातच ग्रामीण भागात लहान मुले-मुली उन्हा-तान्हात खेळत असतात.अश्याच प्रकारे गुरुवार २४ एप्रिल रोजी जिल्हा परिषद शाळेच्या पहिल्या वर्गात शिकत असलेली चिमुकली सकाळच्या शाळेतून घरी आल्यानंतर दिवसभर उन्हामध्ये खेळत होती.उन्हामध्ये खेळत असतांना अचानकपणे तिला चक्कर आला.चक्कर येऊन ती खाली कोसळली.खाली कोसळताच जागीच गतप्राण झाली.सदरची घटना यवतमाळ जिल्ह्यातील चिखलदरा पोड येथे घडली असून सोनाश्री विठ्ठल भुरकुटे वय ७ वर्षे असे उष्माघाताने मृत्यू झालेल्या पहिल्या वर्गातील विद्यार्थिनीचे नाव आहे.घटनेच्या दिवशी यवतमाळ जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४४ अंशावर गेला होता.दिवसभर कडक उन्ह तापत असतांनाच चिमुकली उन्हात खेळली,त्यामुळेच तिचा मृत्यू झाला.उष्णतेत वाढ झाली असल्याने प्रथमतः लहान मुलांची कुटुंबीयांनी काळजी घ्यावी व स्वताच्याही शरीर सुदृढतेकडे लक्ष घालावे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सासऱ्याने केला सुनेचा खून अन् स्वतःच मारली विहिरीत उडी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या यशोधरानगर पोलिस ठाणे हद्दीच्या पिवळी नदी परिसरातील पाहुणे ले-आऊटमध्ये एक खळबळ उडवणारी घटना आज,शनिवार १२ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस...

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; दोन दिवस पावसाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात पावसाची तीव्रता कायम राहणार...

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!