Wednesday, September 2, 2026
Homeनागपूरप्रकरणाचा तपास प्रगतिपथावर असल्याने आरोपींना जामीन देण्यास नकार.. -शंकेची सुई अन् धागाच...

प्रकरणाचा तपास प्रगतिपथावर असल्याने आरोपींना जामीन देण्यास नकार.. -शंकेची सुई अन् धागाच गवसला; शिक्षक घोटाळा प्रकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-शालार्थ आयडी भ्रष्टाचार प्रकरणात वेतन पथक अधीक्षक नीलेश वाघमारे यांना शासनाने १० एप्रिल २०२५ रोजी निलंबित केले.त्यानंतर बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापक पदाची मान्यता दिल्याप्रकरणी शिक्षण उपसंचालक उल्हास नरड, अवैधपणे नियुक्त मुख्याध्यापक पराग नाना पुडके,
माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक नीलेश मेश्राम, शिक्षण उपनिरीक्षक संजय दुधाळकर,कनिष्ठ लिपिक सुरज नाईक यांना नागपूरच्या सदर पोलिसांनी अटक केली.न्यायालयाने त्यांना १६ एप्रिल रोजी न्यायालयीन कोठडी सुनावली.आरोपींना १६ एप्रिलपासून न्यायालयीन कोठडीअंतर्गत मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.त्यानुसार उल्हास नरड सह पाच आरोपींना काल,मंगळवारी २२ एप्रिलला शिक्षण शालार्थ आयडी विभागातील घोटाळ्यामध्ये नियमित जामीन नाकारण्यात आला. प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी (जेएमएफसी)एस. एच.उके यांनी हा निर्णय दिला आहे.त्यांनी जामीन अर्जामध्ये ते निर्दोष असल्याचा आणि त्यांना या प्रकरणात फसविण्यात आल्याचा दावा केला होता. न्यायालयाने या प्रकरणाचा तपास प्रगतिपथावर असल्याने आरोपींना जामीन देण्यास नकार दिला. याशिवाय,आरोपींना जामीन दिल्यास तपासावर वाईट परिणाम पडण्याची शक्यताही विचारात घेण्यात आली.
शंकेची सुई अन् धागाच गवसला👇
भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील पालांदूर येथील मुन्ना तुलाराम वाघमारे यांनी ११ एप्रिल रोजी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.मुन्ना वाघमारे हे २०१० पासून नानाजी पुडके शाळेत रंगरंगोटीचे काम करतात.काही महिन्यांपूर्वी ते केंद्रीय शासकीय शाळेत गेले असता तेथील शिक्षक कर्मचारी पराग नानाजी पुडके यांना चुकीच्या पद्धतीने मुख्याध्यापक बनविल्यासंदर्भात चर्चा करतांना दिसले.या बाबीची विस्तृत माहिती घेतल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.याच पेंटर मुन्ना वाघमारे यांच्या तक्रारीवरुन नागपूर पोलिसांनी सुरुवातीला उल्हास नरड आणि पराग पुडके यांच्यावर गुन्हा दाखल केला.त्यानंतर सुरुवात ते शेवटच्या टोकावरील आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!